Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

पराभव झाला तरी.. निकालाआधी अजित पवारांचा कार्यकर्त्यांना संदेश, सातारा राज्यसभेबद्दल केलं मोठं वक्तव्य

Ajit Pawar party meeting: राजकीय निर्णय घेतल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती, असं राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवार म्हणाले आहेत.

कार्तिक पुजारी

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी ते उपस्थितांना म्हणाले की, 'विजयाचा उन्माद होऊ द्यायचा नाही, पराभवाने खचून जायचं नाही. सर्वांनी मनापासून काम केलं आहे. राजकीय निर्णय घेतल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. २०१९ मध्ये विरोधकांना ७ जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे आपल्याला जास्त जागा मागता आल्या नाहीत.'

लोक देतील तो कौल मान्य करून आपण पुढं जायला हवं. अशी भूमिका सर्वांनी मान्य करायला हवी. आपण वेगळा निर्णय घेतल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. मागच्यावेळी 41 जागा भाजप युतीच्या होत्या. तर विरोधक 7 जागेवर होते.त्यामुळं आपल्याला यंदा जागा कमी मिळाल्या. साताऱ्याला राज्यसभेची जागा आपण देणार आहोत. इतरांनी मागणी करू नये, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

निवडणुका म्हणजे सत्तेत येण्याचं साधन आहे असं आपण मानत नाही. निवडणुका या पाच वर्षांच्या कामाचे मूल्यमापन लोक करतात आणि आपल्याला कौल देतात. कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो. आपण नवीन राजकीय भूमिका घेतली आहे. आपण विधानसभेत ५४ निवडून आलो होतो. जागेबाबत काळजी वाटणं साहजिक आहे. पण, काळजी करण्याची गरज नाही. सर्वांचा मानसन्मान ठेवला जाईल, असं अजित पवार म्हणाले.

नाशिकच्या जागेच्या संदर्भात अनेक आमदार आपल्या आणि भाजपच्या विचाराचे होते. त्यांनी आपल्याला बोलून दाखवलं. थोडा विलंब झाला ही गोष्ट मी नाकारणार नाही. येत्या १० जूनला आपल्याला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. आज ज्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. ते आल्याचा आपल्या पक्षाला नक्कीच फायदा होईल, असं अजित पवार म्हणाले.

धीरज शर्मा यांच्यावर आधीच जबाबदारी होती. त्यांच्यासोबत असंख्य सहकाऱ्यांनी आज प्रवेश केला आहे. 10 जून 1999 साली स्वाभिमानातून आपण पक्ष स्थापन केला. आपण परदेशी मुद्दा समोरं ठेऊन पक्ष काढला आणि 4 महिन्यात त्याचं मुद्द्याला बाजूला ठेवून आपण सत्तेत गेलो. नंतरच्या काळात काही जणांचं पक्षात महत्त्व वाढल आहे. प्रत्येकाला मानसन्मान हवा असतो. कार्यकर्ता महत्त्वाचा असतो, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात बीडमध्ये भाजपा आक्रमक, सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून भाजपाने आंदोलन

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT