NCP Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : सरकार टिकवण्यााठी ते ४० आमदार… ; अजित पवारांचे अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून गंभीर आरोप

रोहित कणसे

शिवसेनेने वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीच्या प्रकरणावरून विरोधकांकडून राज्यातील शिंदे-भाजप सरकारवर जोरदार टीका झाली. या जाहिरातीवरून राजकारण तापलेलं असतानाच आज, १६ जून रोजी जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आज अजित पवारांनी कृषि विभागाच्या धाडी आणि राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राज्य सरकारला धारेवर धरलं.

अकोला येथे बोगस बियाणे, खते विक्रेत्यांवर छापे टाकणाऱ्या पथकामध्ये खासगी व्यक्तींचा समावेश असल्याचा तसेच, या पथकामध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे स्वीय सहायक (पीए) सहभागी झाल्याचा आरोप होत आहे. यावरून अजित पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली.

याप्रकरणावर बोलताना अजित पवार म्हणाले की, खतांच्या किंमती वाढवल्या जात आहेत, साठेबाजी केली जातेय, साठेबाजी केली जातेय. बियाण्यांचा काळाबाजार होतो आहे. छापेमारी या कारणाकरीता करतोय असं कृषि विभाग दाखवतोय. पण छापेमारी करताना मंत्र्यांचेच पीए पाहायला मिळतायतं. मंत्र्यांवर केवलवाणी अवस्था येते. ते म्हणतात की हा माझा पीए नाही, रेकॉर्डवर बघीतलं तर तो त्यांचात पीए निघतोय.

प्रचंड भ्रष्टाचार सुरू झाला असून लोकांमध्ये प्रचंड अस्वस्तता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे दर ठरलेले आहेत असा खळबळजनक आरोप देखील अजित पवार यांनी यावेळी केला.

सरकार टिकवण्यााठी ते ४० आमदार नाराज होऊ नयेत म्हणून ते आमदार सांगतली ती गोष्ट केल्या जात आहेत. मग ते नियमात बसत असेल किंवा नसेल. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज बदली झाली, दुसऱ्या दिवशी स्थगिती आली आणि तिसऱ्या दिवशी दुसऱ्याच ठिकाणी बदली करण्यात आली.

प्रशासनामध्ये बदल्या करण्याचा आधिकार जरूर सरकारचा आहे. लोकाभिमुख कारभार व्हावा यासाठी ते झालं पाहिजे याबद्दल दुमत नाही. मी विरोधाला विरोध करणारा किंवा प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणारा माणूस अजिबात नाही, पण जे दिसतंय ते अतिशय चिंताजनक आहे, असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

What is The Significance Of Pandharpur Wari? पाऊले चालती पंढरीची वाट...

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

SCROLL FOR NEXT