ajit pawar File photo
महाराष्ट्र बातम्या

भाजप आमदाराचा अजित पवारांना सणसणीत टोला; म्हणाले "धरणात..."

भाजप आमदाराचा अजित पवारांना सणसणीत टोला; म्हणाले "धरणात..." अजित पवार यांनी नारायण राणेंवर केला होता हल्लाबोल NCP Ajit Pawar slammed by BJP Atul Bhatkhalkar over Narayan Rane Uddhav Thackeray fight vjb 91

विराज भागवत

अजित पवार यांनी नारायण राणेंवर केला होता हल्लाबोल

मुंबई: नारायण राणे आणि उद्धव ठाकरे ही महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्त्वाची व्यक्तिमत्व. उद्धव ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळाले तर राणे यांना केंद्रात भाजपकडून मंत्रीपद मिळाले. त्यामुळे गेले काही भाजप विरूद्ध शिवसेना असा सामना रंगल्याचे चित्र आहे. नुकतेच कोकणमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण आले. त्यावेळी राज्यातील अधिकारी वर्ग तेथे उपस्थित नव्हते. त्यामुळे रागाच्या भरात राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. या मुद्द्यावरून अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत राजशिष्टाचाराचा मुद्दा मांडला. पण त्याच विषयावरून अजित पवार यांच्यावर भाजप आमदाराने टीकास्त्र सोडलं आहे. (NCP Ajit Pawar slammed by BJP Atul Bhatkhalkar over Narayan Rane Uddhav Thackeray spat)

Narayan-Rane

'सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत अधिकारी सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. मग इथे कोण आहे?', असं राणे म्हणाले होते. त्यावर, 'काही लोकांनी मुख्यमंत्र्यांच्याबाबत अरे-तुरे शब्द वापरले. पण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही', असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणेंचे नाव न घेता त्यांना सुनावलं होतं. त्याच विषयीचे एक कात्रण भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट केले आणि अजित पवार यांना त्यांच्या एका जुन्या विधानाचा दाखला देत टोला लगावला.

अजित पवार यांनी राणे यांना टोमणा लगावताना म्हटले होते, "मुख्यमंत्र्यांबद्दल अरे तुरेची भाषा वापरणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी त्या-त्या ठिकाणी जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु प्रत्येक जण तिथे गेल्यानंतर म्हणजे तिथे VIP असतील आणि त्यांचं असं म्हणणं असेल की, आमच्यासोबत कलेक्टर असले पाहिजे, प्रांत असले पाहिजे तर अशी अपेक्षा तिथे कुणी करु नये." याच प्रकारानंतर भाजप आमदाराने अजित पवारांवर टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Doctor Case : फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण - उपसभापति नीलम गोऱ्हेंची कठोर भूमिका, पोलिसांना चार्जशीट दाखल करण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : डॉ. संपदा मुंडे प्रकरणात जाणीवपूर्वक चारित्र्यहनन केलं जात आहे - रोहित पवार

Kashi visit: 'गंगा स्नानाने बदलले माझे जीवन, मांसाहार सोडून स्वीकारली शुद्ध शाकाहारी जीवनशैली,' उपराष्ट्रपतींनी काशीत सांगितला अनुभव

Crime News : आईचा प्रेमसंबंधाला विरोध, अल्पवयीन मुलीने प्रियकर अन् मित्रांच्या मदतीने केला खून, टॉवेलने गळा दाबला अन्...

PMC Schools : पुणे महापालिकेचा 'साडे चार कोटी'चा प्रस्ताव रद्द! आयुक्तांनी वाचवले पालिकेचे पैसे; पुस्तके खरेदीतील 'घाई'वर प्रश्नचिन्ह!

SCROLL FOR NEXT