अजित पवार sakal
महाराष्ट्र बातम्या

अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये आज दिग्गजांचा प्रवेश

नामदेव कुंभार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित आज, 16 सप्टेंबर रोजी अनेक दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रस पक्षामध्ये प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रस पक्षाच्या मुंबई कार्यालयात प्रवेश सोहळा रंगणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे दिग्गज नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रस पक्षातील इनकमिंग सुरु झाली आहे.

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्यासह शांताबाई फेम संजय लोंढे, गायिका डॉ. देवयानी बेंद्रे यांच्यासह सोलापूरातील एका दिग्गज नेत्याचाही राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. आज, दुपारी अजित पवार यांच्या उपस्थित प्रवेशसोहळा रंगणार आहे.

आतापर्यंत कलेची सेवा केली आहे. आता राजकारणात जनतेची सेवा करायची आहे. महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत. गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळेच 16 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, अशी प्रतिक्रिया सुरेखा पुणेकर यांनी दिली.

शेट्टींच्या जागी पुणेकर?

विधान परिषदेच्या 12 जागांची यादी राज्यपाल यांनी अद्याप मंजूर केलेली नाही. सुत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या वृत्तानुसार, राजू शेट्टी यांच्या नावावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून राजू शेट्टी यांचं नाव दिलं होतं. राज्यापालांच्या आक्षेपानंतर राष्ट्रवादीने राजू शेट्टी यांचा पत्ता कट केल्याचं बोललं जात आहे. त्याजागी आता सुरेखा पुणेकर यांची वर्णी लागणार का? अशी चर्चा आता रंगली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT