Sharad Pawar Supriya Sule  sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar News : शरद पवारांच्या गुगलीवर फडणवीसांचा सिक्सर, उद्धव ठाकरे हिट विकेट; केंद्रीयमंत्र्यांची प्रतिक्रिया

रोहित कणसे

अजित पवारांच्या बंडमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुसऱ्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरुन आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रीया येत आहेत. भाजपचे नेते आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत शरद पवारांना डिवचलं आहे.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणे यांनी ट्वीट करत शरद पवारांच्‍या गुगलीवर सिक्‍सर पडल्याचे राणे म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्‍या यॉर्करवर राष्‍ट्रवादीचा त्रिफळा उडाला असल्याचा खोचक टोला राणेंनी लगावला आहे.

"शरद पवारांच्‍या गुगलीवर सिक्‍सर! देवेंद्र फडणवीस यांच्‍या यॉर्करवर राष्‍ट्रवादीचा त्रिफळा उडाला. उध्‍दव ठाकरे हिट विकेट आणि संजय राऊत स्‍वत:च्‍या पायात अडकून पडून रन आऊट. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन!" असे राणे म्हणाले आहेत.

'या' आमदारांनी घेतली मंत्रिमंडळाची शपथ

उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीमधून छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्माराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे या मातब्बर नेत्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मध्यरात्री अंतरवालीत घडलं मोठं नाट्य; सरकार-जरांगे चर्चेचा निकाल काय? जाणून घ्या आतली माहिती

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

'या' अभिनेत्रीच्या तोंडाचा येत होता वास, बॉबी देओलने किसिंग सीन देण्यास दिला स्पष्ट नकार, नक्की काय घडलेलं?

Gold Price Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांची नफावसुली, खरेदीदारांसाठी चांगली संधी

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

SCROLL FOR NEXT