Sharad Pawar Ajit Pawar Mharashtra Politics Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : मोठी बातमी! अजित पवार गटाचे नेते शरद पवारांच्या भेटीला

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याचं पाहायला मिळालं. या दरम्यान आज अचानक अजित पवार गटाचे नेते शरद पवारांच्या भेटीला पोहचल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांना भेटण्यासाठी अजित पवार यांच्यासोबतच अदिती तटकरे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ हे नेते यशवंतराव चव्हाण सेंटरवर पोहचले असल्याची माहिती मिळत आहे.

शरद पवार यांचा आशीर्वाद मिळणार का?

उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, या पार्श्वभूमिवर अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानावर बैठक बोलवण्यात आली होती. ही बैठक संपल्यानंतर अजित पवार गटातील सर्व प्रमुख नेते शरद पवारांच्या भेटीला पोहचल्याचे पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादीतील फुटीला १५ दिवसही उलटले नाही तोच महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा हालचालींना वेग आला आहे. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शरद पवार यांचा आशीर्वाद अजित पवार आणि मंत्र्यांना मिळणार का? हा प्रश्न देखील विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT