NCP esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP : ''राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं, परंतु उद्धव ठाकरेंनी...'' प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्याने खळबळ

संतोष कानडे

नागपूरः नागपूरमध्ये अजित पवार गटाच्या पहिल्या संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक दावा केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरु झालेल्या आहेत.

२०१९मध्ये उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जात भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं होतं. त्याचं कारण होतं मुख्यमंत्रीपद. अमित शाह यांनी आपल्याला अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल शब्द दिला होता, असा दावा उद्धव ठाकरेंना केलेला. त्यानंतरही त्यांनी वारंवार याबद्दल भाष्य केलं.

२०२२ मध्ये पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड करुन भाजपसोबत जात सत्तास्थापन केली. त्यामुळे उद्धव ठाकरे गट सत्तेपासून दूर झाला. मात्र महाविकास आघाडीची सत्ता असताना उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपद मागितलं होतं, असा नवीनच गोप्यस्फोट आता प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, शिवसेनेकडे ५६ आमदारांचं संख्याबळ होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेकडे ५४ आमदार होते. त्यामुळे राष्ट्रवादीला दोन-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो असता ते काहीच बोलले नाहीत.

पटेल म्हणाले की, राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावं, यासंदर्भातील चर्चा झाली त्यावेळी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हेदेखील उपस्थित होते. परंतु त्यांनी मौन बाळगलं. राष्ट्रवादीला त्यापूर्वीदेखील संधी आलेली मात्र मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, ही खंत आहे. असं म्हणत त्यांनी काँग्रेसवरही आक्षेप नोंदवला.

उद्धव ठाकरे जो मुद्दा उपस्थित करतात तोच मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थित केल्याने ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेल. अद्याप ठाकरे गटाकडून प्रफुल्ल पटेल यांच्या विधानवर कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे स्टेशनच्या कॅन्टीनमध्ये किळसवाणा प्रकार! सँडविचसाठी वापरणाऱ्या टोमॅटोवर उंदराचा वावर, Viral Videoनंतर रेल्वेची कारवाई

MPSC Quota Change: एमपीएससी सरळ भरतीतील ६०-४० गुणोत्तर बदलावर काँग्रेसचा संताप; नव्या जीआरला अन्यायकारक ठरवत रद्दची मागणी

"माझा, आवडता पार्टनर!" विराट कोहलीची भावनिक पोस्ट; अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीवर सचिन तेंडुलकर ते वीरूपर्यंत सर्व झाले व्यक्त

CMO Office: देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील कार्यालयाचा पत्ता बदलणार! आता 'ही' इमारत सत्तेचे नवे केंद्र बनणार; सरकारचा मोठा निर्णय

Pune Burglary Spree: पुण्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच; मार्केट यार्ड, वारजे, लोहगाव, महर्षीनगरमध्ये लाखोंचा ऐवज चोरीला

SCROLL FOR NEXT