महाराष्ट्र

नितेश राणेंच्या पाठीवर राष्ट्रवादी अन् मनसेचा 'हात'

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नारायण राणेंचे पुत्र आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी बांधकाम उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर काम न केल्याचा आरोप करत चिखलफेक करून धक्काबुक्की केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. न्यायालयाने देखील त्यांना दणका दिला आणि यानंतर त्यांना जेलची हवा खावी लागली.

याप्रकरणी, आता चांगलंच राजकारण तापू लागलं आहे. जेलची हवा खावी लागल्यानंतर नितेश राणे यांना राष्ट्रवादी आणि मनसेने पाठिंबा दिला आहे. नितेश राणे यांच्या समर्थनार्थ मनसे आणि राष्ट्रवादी 16 जुलै रोजी जेलभरो आंदोलन करणार आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिडित प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन राज्य सरकार खंबीरपणे आपल्या पाठिशी उभा आहे, असं सांगून राणेंना दणका दिला. पाटलांनी शेडेकर कुटुंबियांची भेट घेतली तेव्हा राणेंवर खुनाच्या प्रयत्नाचं कलम लावण्याचे आदेश आपण एसपींना दिल्याचं सांगितलं होतं. या प्रकरणाचा व्हीडिओही समोर आला होता. मात्र पाटलांनी युटर्न घेत असं मी म्हणालोच नव्हतो, असं घुमजाव केलं.

दरम्यान, न्यायालयाने 9 जुलैपर्यंत नितेश राणे यांना पोलिस कोठडी सुनावली होती. आज त्यांना सुनावणीसाठी न्यायालयात आणलं आहे. न्यायालय त्यांना जामीन देतं का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, नितेश राणे कसे चुकीचे आहेत हे अनेक जणांनी सांगितलं तर नितेश राणेंनी केलं ते योग्यच केलं. अधिकाऱ्यांना हीच भाषा समजते, अशा प्रतिक्रिया आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: अमेठी, रायबरेलीची जागा लवकरच जाहीर होणार; खर्गे घेणार पत्रकार परिषद

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT