NCP Chhagan Bhujbal demenad Strict action on sambhaji bhide Mahatma Gandhi Controversial Statement  
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Bhide Controversy : भिडेंवर कठोर कारवाई का होत नाही? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

रोहित कणसे

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वेगवेगळ्या स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.यादरम्यान भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला ही चांगली गोष्ट असून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असे, मत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.

"संभाजी भिडे, खरं म्हणजे तो मनोभर भिडे याच्यावर आम्हीसुद्धा एक केस दाखल केली आहे. आमच्या बंगल्यातील आंबे खाल्ल्यानंतर मुलगा होईल या वक्तव्यावर कोर्टात ती केस सुरू आहे. महात्मा फुले यांच्यावर ते टीका करतात पण महात्मा गांधी यांच्यावर देखील ते अत्यंत गलिच्छ पद्धतीने ते टीका करतात, मला खात्री आहे, पंतप्रधान मोदी किंवा अमित शाह कुणालाही हे आवडणार नाही.

"महात्मा गांधींना अख्खं जग नमन करतं. मी अनेक ठिकाणी गेलो, असं क्वचित देश असेल जेथे महात्मा गांधींचा पुतळा नाही. त्यांच्यावर गलिच्छ स्वरूपात टीका करतात त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे" असे भुजबळ म्हणाले. "त्यांच्यासोबत जाणं राजकारणासाठी आत्मघातकी आहे, महात्मा गांधींना असं बोललं तर देशातीलच तर नाहीच, गुजरातमधील कुठलाही बांधव-भगिनी सहन करेल का मग ते मोदी असतील किंवा शाह असतील..." असेही भुजबळ म्हणाले.

"त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही म्हणून ते रोज नवीन काहीतरी बोलत राहातात. काल ते पंडित नेहरूंनी देशासाठी काही योगदान नाही असं ते म्हणतात. पण त्यांचे वडिल देशातील सर्वात श्रीमंत वकील त्यांनी देशासाठी सर्व काही दिलं, स्वःता साडेअकरा वर्ष नेहरू तुरुंगात राहिलेत असेही भुजबळ यावेळी म्हणाले. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर त्यांची स्तुती करू नका पण असली टीका मला आवडत नाही" असेही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

संभाजी भिडे यांच्यावर कठोर कारवाई का होत नाही? असे विचारले असता भुजबळ म्हणाले की, "कारवाई झाली पाहीजे, आम्ही कोर्टात गेलो, पण कोर्टात तारीखच लागत नाही. शेवटी सरकार केस करणार, पण केस केल्यानंतर ती लवकर वर आली पाहिजे. तारखांवर तारखा पडतात. आम्ही स्वतः कोर्टात गेलो आहोत. मला कधी-कधी वाटतं की मनोहर भिडे यांचं डोक ठिकाण्यावर आहे की नाही, तेच मला कळत नाही" असेही छगन भुजबळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT