NCP chief Sharad Pawar attacks Devendra Fadnavis on Fort issue in Latur 
महाराष्ट्र बातम्या

किल्ल्यांतून ‘छमछम’चा इतिहास सांगणार का?

सकाळ वृत्तसेवा

लातूर - महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास आहे. त्यांच्या किल्ल्यांतून शौर्याचा इतिहास शिकवण्याऐवजी तेथे दारूचे बार काढण्याचा निर्णय युतीच्या शासनाने घेतला आहे. या किल्ल्यांतून आता ‘छमछम’चा इतिहास सांगणार का, असा सवाल  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केला. असा निर्णय घेताना शरम कशी वाटली नाही, अशा शब्दांत त्यांनी  टीका केली. 

येथे बुधवारी (ता. १८) झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. ‘लातूरमध्ये भूकंप झाला तेव्हा अवघ्या दोन तासांत विलासराव देशमुख यांच्यासोबत मुख्यमंत्री म्हणून मी येथे पोचलो. पंधरा दिवस येथेच राहिलो. भूकंपाचे मोठे संकट होते. त्याचा आम्ही सर्वांनी मिळून  सामना केला. आज सांगली, कोल्हापूरमध्ये मोठा पूर आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीत अर्धा तास थांबले. कोल्हापूरमध्ये तर गेलेच नाहीत. हवाई फेरी काढून त्यांनी पाहणी केली. संकटग्रस्तांना मदत न करणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना घरी बसवा’ असे आवाहन पवार  यांनी कार्यकर्त्यांना केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT