Sharad Pawar Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : आता एवढं बोलले तर राष्ट्रपती राजवट का लागली तेही सांगा? - देवेंद्र फडणवीस

पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली, अशा आशयाचं विधान शरद पवार यांनी केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली नसती, अशा आशयाचं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, याच विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "बरं झालं की आता त्यांनी स्वत:च याबद्दलचा खुलासा केला आहे. आता एवढं बोलले तर राष्ट्रपती राजवट का लागली, या पाठीमागे कोण होतं, कोणाच्या सांगण्यावरून लागली, त्याचं नेमकं कारण काय अशा सगळ्या गोष्टींचाही ते खुलासा करतील ही माझी अपेक्षा आहे. या सगळ्या कड्या जोडल्या तर सगळ्या गोष्टी अजून स्पष्ट होतील."

काय म्हणाले शरद पवार?

पुण्यातल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, "पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवारांनी बोलण्याची गरज नाही. काही गोष्टींबाबत तसंही बोलण्याची गरज नसते. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठली असती का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT