NCP Chief Sharad Pawar On NCP MLAs Meeting At Ajit Pawar Devgiri Bungalow  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : मुंबईतील बैठकीविषयी मला माहिती नाही; अजित पवारांच्या बैठकीबाबत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

रोहित कणसे

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज त्याच्या देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या समर्थक आमदारांची बैठक पार पाडली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अजित पवारांनी स्विकारावे अशी अग्रही भूमिका घेतल्याची माहिती समोर आळी होती. यानंतर पुण्यात असलेल्या शरद पवारांनी या बैठकीबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

विरोधी पक्ष नेता म्हणून विधीमंडळाच्या सदस्यांची बैठक बोलवण्याचा त्यांना अधिकार आहे आणि आजचा विषय काय आहे याची सविस्तर माहिती आलेली नाही. संध्याकाळपर्यंत लोक येत-जात आहेत, यापेक्षा अधिक माहिती माझ्याकडे नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत.

अजित पवार यांनी प्रदेशअध्यक्षपदासाठीच राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली अशी चर्चा आहे यावर बोलताना शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, या विषयाच्या संबंधी एक बैठक मी सहा तरखेला बोलवली आहे. या बैठकीत संघटनेमध्ये काही पुनर्चना आहे का? महिला, युवक अन्य घटक आहेत त्यांच्या ज्या शाखा आहेत, त्यामध्ये काही बदल करायचं आहे का यावर निर्णय होतील. अजित पवारांनी काही गोष्टी सुचवल्या आहेत. नव्या लोकांना संधी द्यावी अशी ती सूचना होती यावर विचार करण्यासाठी ही बैठक बोलवली आहे.

दादांनी आज बोलवली ती बैठक आमदारांची असेल, विरोधीपक्ष नेत्याचं नेतृ्त्व त्यांच्याकडे आहे. त्यांच्या बैठका होतच असतात. सहा तारखेच्या बैठकीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांना मी बोलवलं आहे असेही शरद पवार म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचे आज पाहायला मिळाले होते अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची नुकतीच बैठक पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यध्यक्ष सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल देखील या बैठकीला हजर होते. प्रदेशाध्यक्षपदा संदर्भात ही बैठक झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान अजित पवार हे प्रदेशाध्यक्षपदावरून नाराज असल्याचे तसेच त्यांच्याकडून दबावतंत्र वापरले जात असल्याच्या देखील चर्चा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT