NCP-Sharad-Pawar
NCP-Sharad-Pawar 
महाराष्ट्र

शरद पवारांनी आमदारांसोबत पहिल्या रांगेत उभे केलेले निघाले 'शरद पवार'च!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता.13) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्या नवनिर्वाचित आमदारांसह विधानभवनात गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथील सुरक्षा रक्षकाला आमदारांसोबत फोटोसाठी पहिल्या रांगेत उभा करत फोटो काढला. पवारांच्या या कृतीमुळे उपस्थित सर्व आमदारही भारावून गेले. 

आमदारांच्या आग्रहास्तव छायाचित्र काढण्यासाठी उभे राहिलेल्या पवारांचे लक्ष तिथे कोपऱ्यात असणाऱ्या विधानभवनाच्या सुरक्षारक्षकाकडे गेले. तेव्हा त्यांनी सुरक्षा रक्षकाला बोलवून घेतलं. आणि पहिल्या रांगेत स्वतःसोबत उभे करत फोटो काढला. साहेबांचे एवढे बारीक लक्ष आणि आपुलकी पाहून त्या कर्मचाऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तर, आमदारही त्यांची ही कृती पाहून भारावून गेले होते.

एखाद्या नेत्याने सुरक्षा रक्षकासोबत फोटो काढणे यात विशेष असं काय? असं वाटणं साहजिक आहे. मात्र, महत्त्वाची गोष्ट ही आहे की, ज्या सुरक्षा रक्षकासोबत शरद पवारांनी फोटो काढला, योगायोगाने त्यांचं नावही शरद पवारच असल्याची गोष्ट आता पुढे आली आहे. आणि एवढेच नाही, तर ते देखील बारामतीचेच आहे. किती हा योगायोग. बारामती तालुक्यातील जोगवाडी हे त्यांचे गाव. विधान भवनात सुरक्षा रक्षक म्हणून शरद पवार गेल्या 34 वर्षांपासून कार्यरत आहेत. 

त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर सुरक्षा रक्षक शरद पवारांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हापासून त्यांना जवळून पाहत आहे. मात्र, खूप वर्षांनंतर ते काल वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात आले. त्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यालयात जात असताना त्यांच्याशी पुन्हा एकदा भेटण्याचा योग आला. यावेळी मीदेखील बारामतीचा असल्याचे त्यांना सांगितले. यावेळी त्यांनी आपुलकीने माझी विचारपूस केली.  

मी बारामती तालुक्यातील जोगवडी गावचा रहिवासी असून 34 वर्षांपासून विधान भवनात सेवा बजावत आहे. तसेच तुमच्या आणि माझ्या नावात साम्य असल्यामुळे मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्रीदेखील मला ओळखतात. तालुक्यातीलच असल्याने अजित पवार यांच्याशीही माझी चांगली ओळख आहे. मात्र, शरद पवार या नावावर कोणतंही दुषण लागणार नाही, अशी कृती आतापर्यंतच्या सेवा कारकीर्दीत कधी केली नाही, असे ते अभिमानाने सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT