NCP Party and Symbol Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Party and Symbol: पक्षाचं नावं आणि चिन्ह आल्यानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले, "मी हा निर्णय…"

NCP Party and Symbol: निवडणूक आयोगाने आज (मंगळवारी) हा मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाले आहेत. निवडणूक आयोगाने आज (मंगळवारी) हा मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत!," असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी एक्सवर पोस्टमध्ये स्वत:ला राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहीर केलं आहे.

आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. शरद पवार गटाने ७ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नावे आणि चिन्हे सादर करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, लोकसभा, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून तयारी सुरू करण्यात आली होती. पक्ष आणि चिन्ह याबाबतचा निर्णय निवडणुक आयोगाने आपल्या बाजूने दिला नाही तर पक्षाच्या चिन्हासाठी काय पर्याय असणार यासंदर्भात शरद पवार गटाची बैठक पार पडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT