NCP Crisis 
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis: वरतून दबाव आणून पक्षचिन्ह, नाव जावू शकतं अशी शंका, तरी...; अनिल देशमुखांचं मोठं विधान

रवींद्र देशमुख

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आले आहे. अजित पवार गटाने केलेले सर्व दावे शरद पवार गटाने फेटाळले आहेत. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधातही शरद पवार गटाने अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत लवकरच निर्णय येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया आली आहे.

अनिल देशमुख म्हणाले की, पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव यासाठी आमची निवडणूक आयोगाकडे लढाई सुरु आहे. आमचे वकील बाजू मांडत आहे. मागच्या वेळी वरतून दबाव आणून चिन्ह, पक्ष एकनाथ शिंदे यांना दिलं, तसचं राष्ट्रवादीबाबतही होण्याची भीती आहे. केंद्रातील सत्तेचा वापर करून हे घडवून आणलं जावू शकतं. मात्र शिवसेनेपेक्षा आमचा वेगळा विषय आहे. त्यावेळी सुप्रिम कोर्टाचा निर्णय झाला नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोग आमच्याच बाजुने निर्णय देईल याची खात्री आम्हाला असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी दावा केला असेल कारण त्यांना वाटतं, केंद्रात भाजपच सरकार आहे. सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोग निकाल देईल, अशी त्यांना आशा असेल. मात्र आमची बाजू न्यायिक आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही पुरावे दिले आहेत. ८० टक्के पदाधिकारी शरद पवार यांच्यासोबत आहेत. हीच आमची भूमिका आम्ही निवडणूक आयोगाकडे स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे पक्ष चिन्ह आणि पक्ष आम्हालाच मिळेल, असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं.

विदर्भाचे राष्ट्रवादीचे सर्वात मोठे नेते प्रफुल्ल पटेल होते. तेच आता बोलत असतील की अनिल देशमुखांनी विदर्भात राष्ट्रवादी वाढू दिली नाही, तर ते स्वत:च्या कामावर शंका घेत आहेत. वरिष्ठ नेते म्हणून तुम्ही काय केलं, असा सवाल अनिल देशमुख यांनी प्रफुल्ल पटेल यांना विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींना मानवंदना

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT