Dilip Walse Patil News esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis : भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? दिलीप वळसे-पाटलांचं 'साहेब-दादां'बाबत परखड भाष्य

राष्ट्रवादीच्या (NCP) घड्याळ चिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोग करेल. त्यावर अधिक सांगता येणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

अजित पवार यांनाच अध्यक्ष करण्यासाठी खासदार शरद पवार यांनी बैठक बोलावली होती. मात्र, तेव्हा अजित पवार अध्यक्षपद नको म्हणाले होते, असे जयंत पाटील यांनी म्हटले होते.

सातारा : राष्ट्रवादीच्या (NCP) घड्याळ चिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोग करेल. त्यावर अधिक सांगता येणार नाही; पण भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील, असे वाटत नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील (Dilip Walse-Patil) यांनी व्यक्त केले.

सहकारमंत्री वळसे- पाटील काल (शनिवार) रयत शिक्षण संस्थेच्या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने साताऱ्यात आले आहेत. या वेळी त्यांच्याशी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांनी संवाद साधला. श्री. वळसे पाटील यांनी जयंत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर बोलणे टाळले.

राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार (Sharad Pawar) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दोन्ही गट सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने चिन्हाच्या प्रश्नावरून आमनेसामने आहेत. दोन्हीपैकी कोणत्या गटाला घड्याळ चिन्ह मिळेल, असे आपल्याला वाटते, या प्रश्नावर श्री. वळसे- पाटील म्हणाले, ‘‘घड्याळ चिन्हासंदर्भातील निर्णय निवडणूक आयोग करेल; पण ऐनवेळी हे दोन गट एकत्र येतील, असे मला वाटत नाही.’’

अजित पवारांचे समर्थक व पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोत वाघेरे यांनी आज उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे, याबाबत वळसे पाटील म्हणाले, ‘‘वाघेरे यांना या आधी संधी दिली होती. त्या ठिकाणी दुसरे नेतृत्व तयार झाले आहे. कदाचित त्यांचे नाव यादीत येणार नाही हे कळाल्यामुळेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा हा निर्णय घेतला असावा.’’

अजित पवार यांनाच अध्यक्ष करण्यासाठी खासदार शरद पवार यांनी बैठक बोलावली होती. मात्र, तेव्हा अजित पवार अध्यक्षपद नको म्हणाले होते, असे जयंत पाटील यांनी म्हटले होते. याबाबत वळसे पाटील म्हणाले, ‘‘माझ्यासमोर अशी चर्चा झाली नव्हती. मला त्याबाबत काहीही माहीत नाही.’’ ठेकेदारांना निवडणुकीपूर्वी ३३०० कोटींचा ठेका देण्याचा प्रयत्न दिसतोय, असा आरोप एकनाथ खडसे यांनी सरकारवर केला होता. त्याबाबतही वळसे पाटील यांनी मौन बाळगत हा प्रश्न अजित पवार यांनाच विचारा, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT