महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis : राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता; शरद पवार गटाने तातडीने घेतली 'ही' भूमिका

संतोष कानडे

नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा? या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये शुक्रवारपासून सुनावणी सुरु झाली आहे. सुनावणीच्या पहिल्याच दिवशी स्वतः शरद पवार आयोगाच्या कार्यालयात उपस्थित होते. दुपारी ४ वाजता या सुनावणीला सुरुवात झालेली होती.

निवडणूक आयोगामध्ये सुरु असलेल्या सुनावणीमध्ये दोन्ही गटांनी युक्तिवाद केला. राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्याने आमदारांच्या संख्येवरच पक्ष कुणाचा हे ठरेल, असं अजित पवार गटाचं म्हणणं होतं. तर देशभरातील पक्षसंघटना शरद पवार यांच्यामागे असल्याचं पवार गटाने स्पष्ट केलं.

मीडिया रिपोर्टनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षचिन्ह आयोगाकडून गोठवलं जावू शकतं. त्यामुळे शरद पवार गटाने पक्ष कुणाचा हा निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नये, अशी भूमिका घेतली होती. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

दुसरीकडे अजित पवार गटाने म्हटलं की, ज्याप्रमाणे शिवसेनेला पक्षचिन्ह आणि नाव दिलं तसंच आम्हालाही द्या.

अजित पवार यांच्यासह ९ आमदारांवर कारवाई करावी, असं एक पत्र विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलेलं होतं. ते पत्र निवडणूक आयोगामध्ये शरद पवार गटाकडून सादर करण्यात आलं. मात्र अशी मागणी करणारं पत्र बेकायदेशीर आहे, कारण मुख्य प्रतोद आमच्यासोबत आहेत, असा मुद्दा अजित पवार गटाने प्रस्तूत केला.

दरम्यान, शुक्रवारची सुनावणी संपलेली असून पुढची सुनावणी येत्या सोमवारी दुपारी ४ वाजता ठेवण्यात आलेली आहे. सुनावणीनंतर वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, राष्ट्रवादीचे ९९ टक्के कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत असून अजित पवार गटाची कागदपत्रं ही खोटी आहेत. आयोगासमोर आम्ही सक्षमपणे बाजू मांडत आहोत, असं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT