Sharad Pawar vs Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis : साहेबांचीच पाॅवर! राज्यातला 'हा' एकमेव मतदारसंघ, जिथं अजितदादांच्या गटाचा एकही पदाधिकारी नाही!

दक्षिणेत राष्ट्रवादीचे नेते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत.

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र, भाजपचे नेते अतुल भोसले यांनीही भाजपचा गट ताकदीने उभा केला आहे. त्यामुळे काँग्रेसपाठोपाठ भाजपही स्ट्रॉँग आहे.

काँग्रेसचा (Congress) पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या कऱ्हाड दक्षिणेत (Karad South) राष्ट्रवादीची ताकद पहिल्यापासून अत्यल्प आहे. राष्ट्रवादीत ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार (Ajit Pawar) दोन गट झाल्याने कऱ्हाड दक्षिणेत राष्‍ट्रवादीची ताकद आणखीनच क्षीण झाली आहे. दक्षिणेत राष्ट्रवादीचे नेते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत.

त्यातील बहुतांशी नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पाठीशी आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळावर अभिवादन करण्यासाठी ज्येष्ठ नेते पवार आले होते, त्या वेळी त्यांच्या स्वागतासाठी दक्षिणेतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दक्षिणेतील अॅड. आनंदराव पाटील- उंडाळकर एकमेव तटस्थ आहेत.

राजेश पाटील- वाठारकर, अविनाश मोहिते यांच्यासह पदाधिकारीही ज्येष्ठ नेते पवार गटात आहेत. अजित पवार यांच्याकडे नेता, पदाधिकारच नसल्याची स्थिती आहे. कऱ्हाड दक्षिणेत ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते, माजी मंत्री ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यासारख्या दिग्गजांनी प्रतिनिधित्व केले आहे. सध्याची धुरा ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आहे.

दक्षिणेत सातत्याने काँग्रेसचा विजयावर शिक्कामोर्तब आहे. विधानसभा मतदारसंघाची २००९ मध्ये झालेल्या पुनर्रचनेत कऱ्हाड शहराचा दक्षिणेत समावेश झाला. तेव्हापासून दक्षिणेतील राजकारणावर शहराचा प्रभाव आहे. त्यामुळे वेगळी राजकीय समीकरणे होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्याचा फारसा परिणाम न झाल्याने मतदारसंघावरील काँग्रेसचा प्रभाव कायम राहिला.

राष्ट्रवादी व काँग्रेसच्या संघर्षाच्या काळात राष्ट्रवादीचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष विलासराव पाटील-वाठारकर यांनी पक्षाच्या एकत्रित बांधणीचे प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना अपेक्षित यश आले नाही. परिणामी, राष्ट्रवादीची तोकडीच राहिली. कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांचा शहराच्या राजकारणावर प्रभाव आहे. पालिकेत त्यांचा गट सक्रिय आहे, मात्र पालिका व विधानसभेच्या राजकारणात फरक असल्याने तोही प्रभाव अपेक्षित दिसत नाही.

मात्र, दक्षिणेत आमदार पाटील यांच्याच नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचेच काम सुरू असल्याचे वास्तव आहे. राष्ट्रवादीत अजित पवारांच्या बंडानंतर राज्यभरात राजकीय उलथापालथ झाली, तरीही कऱ्हाड दक्षिणेत अपेक्षेप्रमाणे परिणाम झालेला नाही. राष्ट्रवादीच्या ताकदीने प्रमाणे हालचाली दिसल्या नाहीत. दक्षिणेत राष्ट्रवादी तालुका, शहाराध्यक्षापासून विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारीही शरद पवार यांच्या गटात आहेत. नेत्यांनीही पवार यांनाच ताकद दिली आहे.

त्यामुळे कऱ्हाड दक्षिण हा राज्यातील एकमेव असा मतदारसंघ आहे, जेथे अजित पवार यांच्या गटाचा सध्यातरी एकही पदाधिकारी नाही. राष्ट्रवादीचे नेत्यांमधील स्पष्टता अधिक महत्त्वाची आहे. कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादीचे नेते अविनाश मोहिते, राष्ट्रवादीचे नेते राजेश पाटील-वाठारकर अद्यापही शरद पवार यांच्याकडे आहेत.

वाठारकर व अजित पवार यांची जवळीकता पाहता, पुढे काहीही होऊ शकते. आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडी शहरात पालिकेच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांचे पदाधिकारीही एकमुखी शरद पवार यांच्या पाठीशी आहेत. लोकशाही आघाडीचे नेते सुभाष पाटील, जयंत पाटील, सौरभ पाटील यांच्याही भूमिका स्पष्ट आहेत. त्यामुळे शहरातही अजित पवार यांच्या गटाला काहीही हाती लागलेले नाही.

फूट भोसलेंच्या पथ्यावर

कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र, भाजपचे नेते अतुल भोसले यांनीही भाजपचा गट ताकदीने उभा केला आहे. त्यामुळे काँग्रेसपाठोपाठ भाजपही स्ट्रॉँग आहे. भोसले गटाकडे कृष्णा कारखान्यासह संस्थात्मक ताकद मोठी आहे. भोसले गटाचे संघटनही चांगले आहे. अतुल भोसले यांचा गटाची स्वतंत्र ओळख आहे. त्याचा भाजपलाही फायदा होतो आहे.

भोसले राष्ट्रवादीत होते. त्यावेळी राष्ट्रवादीची ताकद होती. सध्या ते भाजपमध्ये आहेत, त्यामुळे काँग्रेसपाठोपाठ भाजपची मोठी येथे ताकद आहे. राष्ट्रवादी येथे तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्री. भोसले यांनी २०१४, २०१९ मध्ये भाजपमधून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात ताकदीने विधानसभा लढत दिली. २०२४ मध्येही अशीच लढत होणार आहे. त्यात राष्ट्रवादीच्या फुटीचा भोसले गटाच्या पथ्यावर पडेल, हे निश्‍चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT