Ajit Pawar vs Jayant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? जयंतरावांनी 25 वर्षांचा दाखला देत पहिल्यांदाच स्पष्ट केली भूमिका

आमच्याच पक्षात एवढा मोठा गोंधळ झाल्यानंतर पक्ष एक ठेवने महत्त्वाचं होतं.

सकाळ डिजिटल टीम

पवारसाहेबांना एकूण १९ आमदारांनी प्रतिज्ञापत्राद्वारे पाठिंबा दिला आहे. आमची संख्या कमी आहे हे आम्ही मान्य करतो.

मिरज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारसाहेबांचा (Sharad Pawar) आहे. ना पक्ष जयंत पाटलांचा आहे ना अजित पवारांचा साहेबांकडून आलेले आदेश आम्ही गेली २५ वर्षे मानतो, असं स्पष्ट मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

साहेबांचा २५ वर्षांचा निर्णय अजित पवारांच्या एका भेटीनंतर एका दिवसात फिरतील असे वाटत नाही, असंही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मिरजेत पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाने सत्तेत सहभागानंतर प्रथमच मिरजेतील सर्वपक्षीय कार्यक्रमानिमित्त शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, पवारसाहेबांची भूमिका ही आमची भूमिका राहील. पलीकडे गेलेल्या आमदारांची भूमिका वेगळी असेल असं मला वाटत नाही. अद्याप दादा गटात गेलेल्या पैकी कोणाची चर्चा झाली नाही. मात्र, मी कायम शरद पवारांसोबत असेल अशी स्पष्ट भूमिका त्यांनी व्यक्त केली. तसेच शरद पवार सांगतील ती दिशा आणि शरद पवार सांगतील ते धोरण असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

आमच्याच पक्षात एवढा मोठा गोंधळ झाल्यानंतर पक्ष एक ठेवने महत्त्वाचं होतं. पाच वर्षांपासून पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. पक्ष वाढीसाठी चांगले प्रयत्न केले आहेत. मोठा पक्ष होण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आणि पक्षात गोंधळ झाला. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, महापालिकेचे गटनेते मैनुद्दीन बागवान, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, संजय बजाज, शहराध्यक्ष अभिजित हारगे उपस्थित होते.

१९ आमदारांचा पाठिंबा

पवारसाहेबांना एकूण १९ आमदारांनी प्रतिज्ञापत्राद्वारे पाठिंबा दिला आहे. आमची संख्या कमी आहे हे आम्ही मान्य करतो.

अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार

१७ जुलैपासून होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, राज्यातील गुन्हेगारी यासह अन्य प्रश्न मांडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT