NCP Party and Symbol Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Party and Symbol: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हातून गेला आता शरद पवारांकडे कोणता पर्याय? नवं नाव अन् चिन्ह की....

NCP Party and Symbol: आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने दिला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. शरद पवार गटाने ७ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नावे सादर करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, लोकसभा, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून तयारी सुरू करण्यात आली होती. पक्ष आणि चिन्ह याबाबतचा निर्णय निवडणुक आयोगाने आपल्या बाजूने दिला नाही तर पक्षाच्या चिन्हासाठी काय पर्याय असणार यासंदर्भात शरद पवार गटाची बैठक पार पडली होती.

या बैठकीमध्ये शरद पवारांनी चिन्हाची यादी देखील केली होती. आता शरद पवार गटाला उद्यापर्यंत त्यांच्या नव्या पक्षाचे नाव आणि चिन्ह जाहीर करावं लागणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये शरद पवार कोणत्या नावावर आणि चिन्हावर निवडणूक लढवणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने हा मोठा निकाल जाहीर केल्यानंतर शरद पवारांकडे दोन पर्याय आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयावर शरद पवार सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागू शकतात किंवा आता शरद पवारांना पक्षासाठी नवं नाव आणि चिन्ह द्यावं लागणार आहे. तसेच निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी उद्यापर्यंतचा वेळ दिला आहे, त्यानंतर आता शरद पवार काय प्रतिक्रिया देणार आणि कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT