NCP Crisis praful patel Clarifies NCP Ajit Pawar Faction All leaders Meet Sharad pawar Chhagan Bhujbal Dilip Walse patil  
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis : फुटीर गटाची शरद पवारांशी चर्चा, सोबत काम करण्याचं आवाहन; पवारांचं मात्र मौनच

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर आज अजित पवार गटातील सर्वच नेते अचानक शरद पवार यांच्या भेटील पोहचले. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज शरद पवारांची भेट घेण्यामागची भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली.

अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आज आमचे दैवत शरद पवार यांचे आशिर्वाद घेण्यासाठी अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, सुनिल तटकरे यांच्यासह हे सर्व नेते वाय बी चव्हाण सेंटरला वेळ न मागता संधी साधून आलो.

आम्ही शरद पवारांच्या पाया पडून आम्ही त्यांचे आशिर्वाद मागितले आणि त्यांना विनंती देखील केली, आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहेच, तसेच राष्ट्रवादी पक्ष एकसंध कसा राहू शकतो याबद्दल त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करावे असी विनंती देखील केली. यावर शरद पवारांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

उद्यापासून राज्याच्या विधानसभेचं अधिवेशन देखील सुरू होत आहे. सर्व मंत्री आपआपल्या मंत्रालयाची जबाबदारी विधानसभेत सुद्धा पार पाडतील असेही प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले.

दरम्यान राष्ट्रवादी पक्षातील बंडानंतर अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला पोहचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीएसटीच्या नियमांमध्ये होणार मोठा बदल, आता विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा खरेदीदाराला नाही, विधी समितीने 'त्या' प्रस्तावाला दिली मंजुरी

Kothrud Assault: कोथरूडमध्ये जुन्या वादातून तरुणावर स्टंपने बेदम मारहाण; मध्यस्थ नागरिकांनाही धमक्या

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Marathi Books: इतिहास, कविता, धर्म आणि काश्मीर सफर; चार नवी पुस्तके.. वाचनविश्वात नव्या पानांची भर

गडचिरोलीत पुन्हा माओवादी हालचालींची चाहूल? कुंडमजवळ बॅनर-पत्रके आढळली; नेमकं काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT