sharad pawar ajit pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis : ''अजित पवारांना पक्षातील सर्व सत्ता हवी होती म्हणून...'' शरद पवार गटाचा युक्तिवाद काय?

संतोष कानडे

नवी दिल्लीः राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षावर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरु आहे. शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामत यांनी अजित पवार गटावर गंभीर आक्षेप घेत कशा पद्धतीने पक्षामध्ये अध्यक्षाची निवड झाली होती आणि आता कशा पद्धतीने फूट पडली, यावर भाष्य केलं.

देवदत्त कामत यांनी युक्तिवाद करताना म्हटलं की, अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व सत्ता हवी आहे. म्हणून त्यांनी प्रफुल पटेल यांच्याशी संपर्क साधला. मात्र दिल्लीत पार पडलेल्या आठव्या अधिवेशनामध्ये शरद पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करतांना प्रस्तावक म्हणून प्रफुल पटेल होते. आता मात्र शरद पवार यांच्या अध्यक्ष पदाच्या निवडीला ते बेकायदेशी संबोधत आहेत. ही सर्व प्रक्रिया निवडणूक अधिकारी म्हणून पितांबर मास्टर यांनी पार पाडली होती. 11 सप्टेंबर रोजी शरद पवार यांची पक्ष अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय अधिवेशनात पितांबर मास्टर यांनी घोषणा केली होती. पितांबर मास्टर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक कार्यक्रम समितीचे प्रमूख होते.

कामत यांनी पुढे युक्तिवाद केला की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जे पदाधिकारी होते त्यांच्या वतीने एकच नाव प्रस्तावित करण्यात आलं होतं. ते नाव शरद पवार यांचं होतं. त्यावेळी पक्षात कुठलीही दुफळी नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली होती. त्याच आधारावर अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. अजित पवार यांच्या वतीने जेव्हा दुसरा गट स्थापन करण्यात आला तेव्हा त्यांनी थेट आपलं अध्यक्ष पदासाठी नाव निश्चित केलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार कुठलीही कारवाई करण्यात आली नाही आणि अध्यक्षपदावर त्यांनी दावा करत स्वतःला अजित पवार अध्यक्ष म्हणून घोषित केले; हे चुकीचं आहे, घटनेला धरून नाही.

शरद पवार यांनाच पक्षाचे अधिकार- कामत

देवदत्त कामत यांनी शरद पवारांची बाजू मांडतांना स्पष्ट केलं की, दिल्ली येथे जे अधिवेशन पार पडलं त्या १० नोव्हेंबरच्या अधिवेशनामध्ये शरद पवार यांना सर्व अधिकार देण्यात आले होते. राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सर्व निवडी करण्याचे अधिकार शरद पवार यांना बहाल करण्यात आले होते. शरद पवार यांना देण्यात आलेले अधिकार सर्व पदाधिकाऱ्यांना मान्य होते. जर पदाधिकाऱ्यांना अधिकार मान्य होते तर मग शरद पवार यांची अध्यक्ष पदाची निवड बेकायदेशीर कशी आहे? या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जवळपास 558 पदाधिकारी उपस्थित होते, पक्षातील हे सर्वोच्च पदाधिकारी शरद पवार यांच्या बाजूने मतदान करणारे होते.

''शरद पवारांच्या निवडीचं पत्र पटेलांनीच पाठवलं''

कामत पुढे म्हणाले की, दिल्लीतील राष्ट्रीय अधिवेशनामध्ये शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे पत्र देशभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यालयांना आणि पदाधिकाऱ्यांना प्रफुल पटेल यांनी पाठवले होते. प्रफुल पटेल यांनी पाठवलेल्या पत्रावरती सर्व कार्यालयानी आनंदाने निर्णय स्वीकारल्याचे कळवले. कोणीही त्याला विरोध केला नव्हता.

राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा शरद पवार यांनी राजीनामा दिला तेव्हा सर्वांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय मान्य केला होता. यामध्ये अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांचा समावेश होता. यामध्ये कुठलाही वाददेखील राष्ट्रीय अधिवेशना दरम्यान झाला नाही. मात्र 30 जून रोजी अजित पवार यांच्या नेतृत्वातील एका गटाने भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा अचानक निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT