Sunil Tatkare sakal
महाराष्ट्र बातम्या

Political Crisis : ''युक्तिवादामध्ये दम नसल्यामुळे वेळकाढूपणा'', सुनावणी संपल्यानंतर तटकरेंची प्रतिक्रिया

संतोष कानडे

नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत संघर्षावर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये वाद सुरु आहे. शुक्रवारची सुनावणी संपलेली असून येत्या बुधवारी पुढची सुनावणी आहे. आजची सुनावणी आटोपल्यानंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटावर आक्षेप घेतले.

सुनील तटकरे म्हणाले की, शरद पवार गटाने आज युक्तिवाद पूर्ण करणं गरजेचं होतं. परंतु त्यांनी युक्तिवाद पूर्ण केला नाही. केसमधील मेरिट लक्षात आल्यामुळे वेळकाढूपणा सुरु आहे. मुळात वकिलांच्या युक्तिवादात दम नसल्यामुळे ज्येष्ठ वकील निघून आले. दोन तासांच्या युक्तिवादामध्ये सतत तेच तेच मुद्दे मांडण्यात आले आहेत.

तटकरे पुढे म्हणाले की, आमच्या बाजूचा युक्तिवाद सुरु होईल तेव्हा सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील. बुधवारी पुढच्या सुनावणीमध्ये ते युक्तिवाद पूर्ण करतील. नाहीतर लेखी म्हणणं मांडण्यास सांगण्यात येईल. त्यानंतरच आमचा युक्तिवाद सुरु होईल. त्यांच्या मुद्द्यांचं सविस्तर कायदेशीर उत्तर आमच्याकडे आहे. आम्ही त्यांचे मुद्दे खोडून काढू.

''सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अलिकडे दिलेले निर्णय आणि निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय बघता आम्ही घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. आमच्याकडे सक्षम पुरावे आहेत. त्यांच्या केमध्ये दम नाही, त्यामुळे तेच ते मुद्दे पुन्हा पुन्हा मांडले जात आहेत'' अशी भूमिका सुनील तटकरे यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT