Sharad Pawar Ajit Pawar Mharashtra Politics Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवारांना ठाऊक नव्हते? अजित पवार गटाला न भेटण्याचा शरद पवार गटाचा निर्णय

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान काल अचानक अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सर्व आमदार आणि मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतली. यानंतर आज पुन्हा अजित पवार गटाचे सर्व नेते, मंत्री शरद पवारांच्या भेटीला पोहचले आहेत.

दरम्यान शरद पवार गटातील आमदारांची २ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरवर बैठक होती. मात्र याआधीच अजित पवार, प्रफुल पटेल हे नेते वाय बी चव्हाण सेंटरवर दाखल झाले. त्यामुळे शरद पवार गटातील सर्व आमदार प्रदेश कार्यालयात निघणार असून त्यांनी अजित पवार गटातील आमदारांना न भेटण्याचा निर्णय घेतला आहे. जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, सुनील भुसार हे नेते वाय बी सेंटरवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात रवाना होतील.

शरद पवारांना कल्पना नव्हती?

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाचे आमदार भेटील येणार असल्याची शरद पवार यांना माहिती नव्हती. पवार येण्याआधी आपण जाऊन बसावं, अशी खेळी अजित पवार गटाकडून खेळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरवर दाखल होताच जितेंद्र आव्हाड यांच्याकडे मीडिया का जमले आहेत याबद्दल विचारणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT