NCP Crisis 
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis: अजित पवार गटाविरोधात ठोस भूमिका का नाही? शरद पवार गटाचे आमदार बैठकीत आक्रमक

Sandip Kapde

NCP crisis: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट निर्माण झाले. यानंतर शरद पवार गट आक्रमक झाला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येवल्यात सभा घेत दंड थोपटले होते. मात्र येवल्यातील सभेनंतर शरद पवार गटात शांतता पसरली. उलट पावसाळी अधिवेशनात शरद पवार गट आणि अजित पवार गटातील आमदार एकत्र चर्चा करताना दिसले.

मात्र शरद पवार यांनी आज भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपला पाठिंबा देणार नाही, संघर्षासाठी तयार राहा, असे शरद पवार यांनी वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे.

दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी शरद पवार गटाच्या आमदारांचे स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या बैठकीत येवल्याच्या सभेनंतर सभा नाही.अजित पवार गट विरोधात ठोस भूमिका नाही, असे प्रश्न आमदारांनी उपस्थित केले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आता शरद पवार यांच्या गटावा नोटिस बजावली आहे. त्यामुळे शरद पवार यांची पुढील भूमिका काय असेल, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला असेल, पण तो विखुरलेला दिसत नाही. याचे ताजे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या निधीच्या वाटपात पाहायला मिळाले.

तसेच सोमवारी महाराष्ट्र विधानसभेत अजित पवार गटाते नेते सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्या भेटीचा खास क्षण समोर आला. एवढेच नाही तर दोघांनी मिठी मारली आणि काही वेळ गप्पा मारल्या. मात्र, दोघांमध्ये काय झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन्ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भेटल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती.

राष्ट्रवादीत फूट पडल्याने अजित पवार यांनी स्वत:ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष घोषित केले होते. तर खुद्द शरद पवार राष्ट्रवादीच्या सर्वोच्च पदावर होते. भारतीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात अजित पवार यांना अध्यक्ष म्हणूनही दाखवण्यात आले आहे. याउलट महाराष्ट्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले पद कायम ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar Beef Seized: 'जुन्नरला चार गाई व दोन टन गोमांस जप्त'; जुन्नर पोलिसांची धडक कारवाई

Latest Marathi News Live Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT