NCP Crisis Sharad Pawar Viral Video 
महाराष्ट्र बातम्या

"कुणाला सांगता म्हतारा झालो... तुम्हाला काय ठाऊक आहे अजून...", निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवारांचा Video चर्चेत

NCP Crisis Sharad Pawar Viral Video : राष्ट्रवादी काँग्रेसमधील वर्चस्वाच्या लढाईत अखेर निवडणूक आयोगाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने कौल दिला.

रोहित कणसे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील वर्चस्वाच्या लढाईत अखेर निवडणूक आयोगाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने कौल दिला. अजित पवार यांचा गट हाच खरा ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ असल्याचे सांगत आयोगाने ‘घड्याळ’ हे पक्ष चिन्ह देखील त्यांना बहाल केले आहे. आयोगाच्या या निवाड्याचे अजित पवार यांच्या गटाने स्वागत करत राज्यभर जल्लोष केला असून शरद पवार गटाने मात्र हा लोकशाहीचा खून असल्याची घणाघाती टीका केली.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला आता स्वतःसाठी पक्षाचे वेगळे नाव सुचवावे लागेल. यासाठी त्यांना तीन नावांचे पर्याय देण्यात आले आहेत. या सादरीकरणासाठी आयोगाने त्यांना उद्या (ता. ७) दुपारी चार वाजेपर्यंतची मुदत दिली आहे.

निवडणूक आयोगाच्या या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी शरद पवार गटाने चालविली आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवडही आयोगाने रद्दबातल ठरविताना यापुढे त्यांना कोणतेही निर्णय घेता येणार नसल्याचे म्हटले आहे.

गेल्या वर्षी २ जुलैला अचानक राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्यासह ९ जणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत थेट मंत्रिपदाचीच शपथ घेतली होती, यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थेट दोन उभे गट पडले होते. शिवसेनेप्रमाणेच हा वाद पुढे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला होता.

दरम्यान या निकालानंतर शरद पवार यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. शरद पवार गटाकडून हा व्हिडीओ सोशल मीडीयावर पोस्ट करण्यात आला आहे.

"मी आता ८०-८२ वर्षांचा झालो- म्हातारा झालो मी त्यांना सांगितलं कुणाला सांगता म्हातारा झालो ... तुम्हाला काय ठाऊक आहे अजून... तुम्ही काय खोलात जाऊन...जोपर्यंत तुम्हा लोकांची साथ आहे तोपर्यंत हे गाडं थकणार नाही आणि थांबणार नाही."असे शरद पवार म्हणताना दिसत आहेत. या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

अजित पवार गट

४१ विधानसभेतील आमदार

५ विधान परिषदेतील आमदार

२ लोकसभेतील खासदार

१ राज्यसभेतील खासदार

नागालँडमधील ७, झारखंडमधील

एका आमदाराचा पाठिंबा

शरद पवार गट

१५ विधानसभेतील आमदार

४ विधान परिषदेतील आमदार

४ लोकसभेतील खासदार

३ राज्यसभेतील खासदार

केरळमधील एका

आमदाराचा पाठिंबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT