Sunil Tatkare sakal
महाराष्ट्र बातम्या

Sunil Tatkare : इतर राज्यातील आमदारही आमच्याच सोबत आहेत; अजित पवार गटाचा दावा

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आज पहिलीच सुनावणी होत आहे. आयोगाच्या कार्यालयात स्वतः शरद पवार दाखल झालेले आहेत. तर अजित पवार गटाकडून उशिरापर्यंत कुणीही दाखल झालेलं नव्हतं. आज केवळ एकाच गटाकडून बाजू मांडली जाईल, असं सांगितलं जात आहे.

याच सुनावणीवरुन अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला असून आमच्याकडे संख्याबळ जास्त असल्याचं म्हटलं आहे. तटकरे म्हणाले की, प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी जे मुद्दे उपस्थित होतील, तेव्हा आम्ही भूमिका मांडत राहू. बहुतांश आमदार आमच्यासोबत आहेत. एवढंच नाही तर राज्यातील पदाधिकाऱ्यांनीदेखील अजित पवारांना समर्थन दिले आहे.

सुनील तटकरे पुढे म्हणाले की, फक्त राज्यातीलच नाही तर नागालँडच्या ७ आमदारांनी मुंबईत येऊन आम्हाला समर्थन दिलं आहे. सुनावणीत जे मुद्दे येतील, त्याची उत्तरं आमच्याकडे आहेत. जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात काय याचिका दाखल केली आहे, ते आम्हाला माहिती नाही.

काय म्हणाले सुनील तटकरे?

  • राष्ट्रवादी पक्षाची घटना ही पिरॅमिड सारखी आहे, शिवसेनेचा वेगळी आहे

  • आमच्या घटनेत निवडणुकीची प्रक्रिया आहे

  • अजित पवार यांच्या निवडीबाबत सुनावणीत मुद्दा आलाच तर आम्ही उत्तर देऊ

  • राज्य आणि देशातील पक्षाचं संघटनदेखील आमच्यासोबत आहे

  • आम्ही अध्यक्षांकडे याचिका केलेली आहे. दावे प्रतिदावे त्यांच्यासमोर मांडले जातील

  • आमच्याकडे ४३ विधानसभा सदस्य आहेत, हा आकडा जास्त देखील असू शकतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

Uttarakhand: युवक आता फक्त नोकरी शोधणारे नाहीत, तर रोजगारनिर्माते; क्रीडा विद्यापीठापासून स्टार्टअपपर्यंत धामींच्या योजना

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च, भोरमध्ये संवेदनशील भागांत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

SCROLL FOR NEXT