Ajit Pawar  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: उद्या तुम्हाला 1 लाख दिले तरी.. मानधन वाढवा म्हणणाऱ्या अंगणवाडी सेविकेला अजित पवारांनी झापलं

Ajit Pawar to Anganwadi worker: एका कार्यक्रमामध्ये अजित पवार बोलत होते. यावेळी अंगणवाडी सेविका देखील उपस्थित होत्या. एक अगणवाडी सेविका उभी राहिली अन् तिने आपली व्यथा मांडली.

कार्तिक पुजारी

मुंबई- १० हजार रुपयांमध्ये काही होत नाही. मानधन वाढवा, असं म्हणणाऱ्या अंगणवाडी सेविकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झापलं आहे. उद्या तुम्हाला १ लाख दिले तरी कमी वाटतील. मानधन वाढवण्यात आले आहे. तुम्ही जे सांगितलं ते लक्षात ठेवतो. योग्यवेळी निर्णय घेतो, असं अजित पवार म्हणाले आहेत.

एका कार्यक्रमामध्ये अजित पवार बोलत होते. यावेळी अंगणवाडी सेविका देखील उपस्थित होत्या. एक अगणवाडी सेविका उभी राहिली अन् तिने आपली व्यथा मांडली. गेल्या पन्नास वर्षापासून आयसीडीएस योजना आहे. ग्राऊंड लेवलची ही योजना आहे. पण, यासाठी काम करणारी अंगणवाडी सेविका आज खूष नाही, असं अंगणवाडी सेविका म्हणाली.

अंगणवाडी सेविका पुढे म्हणाली की, 'आमची मागणी आहे की आमच्या मानधनामध्ये वाढ व्हावी. तुम्हाला विचार करता आला तर तुम्ही यावर जरूर विचार करा. कारण १० हजारामध्ये काहीही होत नाही.' अजित पवारांनी अंगणवाडी सेविकेच्या या मागणीला उत्तर दिले किंवा एकप्रकारे अंगणवाडी सेविकेला झापलं असं म्हणता येईल.

अजित पवार म्हणाले की, 'ज्या वेळेस योजना आली तेव्हा मी आमदार होता. तेव्हा ६० रुपये महिना मिळत होता. ते वाढवत-वाढवत आम्ही इथंपर्यंत आणलं आहे. ही केवळ राज्याची योजना नाही. याला केंद्राचा काही निधी असतो अन् राज्याचा काही निधी असतो. यामध्ये काम फक्त पाच तास असतं. म्हणजे तुम्ही अर्धवेळ काम करता. याचा अर्थ पूर्णवेळेसाठी २० हजार दिल्यासारखं आहे.'

तुम्ही असेच म्हणत बसाल तर उद्या तुम्ही म्हणाल की १ लाखाने देखील काही होत नाही. अंगणवाडी सेविका शिजवण्याचं काम करून अर्धवेळ काम करत असते. मी हा विषय टाळतोय असं नाही. मागे आम्ही कोतवालांचं मानधन वाढवलं, पोलीस पाटलांचं वाढवलं. अंगणवाडी सेविकांचं वाढवलं आहे. तुम्ही सांगितलेलं आम्ही लक्षात ठेवतो आणि योग्यवेळी याबाबत निर्णय घेतो, असं म्हणत अजित पवारांनी अंगणवाडी सेविकेला चूप केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT