NCP Eknath Khadse on Devendra Fadnavis as Deputy Chief Minister maharashtra politics  sakal
महाराष्ट्र बातम्या

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री; खडसेंची खोचक प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या राजकीय गोंधळ अखेर संपला आहे, आज शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. मुखमंत्रीपद मिळल्यानंतर राज्यतील अनेक नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. यादरम्यन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री पदी फडणवीसांची वर्णी लागल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

शपथविधी पूर्ण होताच एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीसांना असं काम करावं लागेल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं, असे खडसे म्हणाले आहेत. खडसेंना पुढे बोलताना म्हणाले की, "घडलेलं नाट्य हे अनपेक्षित आहे, फडणवीस आपल्या ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील असे कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यांना मुख्यमंत्री पदाची खूप अपेक्षा होती पण परिस्थीनुसार त्यांनी हे स्विकारलेलं दिसतंय, मी त्यांना देखील शुभेच्छा देतो." असे खडसे यावेळी म्हणाले.

नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांचे नाव चर्चेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेचा मान ठेवून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी ट्विटही केले होते, ‘एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे.’ असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT