mukta tilak laxman jagtap
mukta tilak laxman jagtap sakal
महाराष्ट्र

विधान परिषद निवडणूक : काँग्रेसच्या आक्षेपावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी सर्व आमदारांची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, अगदी थोड्यावेळात म्हणजे पाच वाजण्याच्या सुमारास याच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान, आज पार पडलेल्या मतदावावर काँग्रेसकडून (Congress) भाजपच्या मुक्त टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला आहे. टिळक आणि जगताप यांची मतपत्रिका दुसऱ्या व्यक्तीने मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याबाबत काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल करण्यात आली असून, काँग्रेसच्या या आक्षेपावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (NCP Leader Amol Mitkar Reaction On Vidhan Parishad Election)

मिटकरी म्हणाले की, टिळक आणि जगतापांचे मतदान कुणाला झाले आणि मतपेटीत कागद कुणी टाकला की दुसरा काही कागद टाकला असा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे. यावर निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल असे म्हणत भाजपकडून यावर उगाच आकवतांडव केला जात आहे. गालिब यांच्या भाषेत जर सांगायचे झाले तर, शरम तो उनको आती है जो शरम को शरमाते है, ये तो इतने बेशरम है की शरम भी इनको शरमाती है| त्यामुळे भाजपच्या बेशरम लोकांनी संवेदनशीलतेवर बोलणं म्हणजे मुर्खपणाचा कळस झाल्याचे मिटकरी म्हणाले.

काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपावर निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईलच त्या निकालाचा सर्वांनी स्वीकार करावा असे मिटकरी म्हणाले. पराभवाच्या भीतीने भाजपकडून अशा प्रकरचा आकाव तांडव करून पाऱ्शभूमी तयार करण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. काँग्रेसला पराभव दिसत असल्याने त्यांच्याकडून आरोप केले जात असल्याचं भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार

Game Of Thrones : लॅनिस्टर गादीचा वारस हरपला.. 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील 'या' कलाकाराचं निधन; पार्टनरची पोस्ट चर्चेत

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंधारे करणार तक्रार; प्रचार सभेतील भाषणावर घेतला आक्षेप

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

IPL 2024 Points Table: 16 पाँइंट्स अन् केवळ तीनच पराभव, तरी कोलकाता-राजस्थानला अद्यापही का मिळालं नाही प्लेऑफचं तिकीट?

SCROLL FOR NEXT