NCP Foundation Day esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Foundation Day: राष्ट्रवादीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पक्षाचा नवा संकल्प; दिल्लीत ज्येष्ठ नेत्यांची बैठक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई/ नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आगामी वर्षात पक्षाची वाटचाल भक्कमपणे करण्यासाठी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांत दिल्लीत चिंतन आणि संकल्प केला जाणार आहे.

यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करणे व आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रभावी कामगिरी करणे या मुद्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक आज (ता.१०) शनिवारी दिल्लीत होणार आहे.

हा कार्यक्रम दिल्लीतील रविशंकर शुक्ला लेनमधील पक्षाच्या कार्यालयात शनिवारी सकाळी १० वाजता होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यानंतर कार्यक्रमांना सुरूवात होईल.

यावेळी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, लोकसभेतील पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे लोकसभा, राज्यसभेतील सदस्य उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा, युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहन यांच्यासह बहुतांश महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

पक्षाचा इतर राज्यांमध्ये विस्तार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील सर्वच नेते उद्या दिल्लीत राहणार असल्याने पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर यावेळी सखोल मंथन होण्याची शक्यता आहे.निवडणूक आयोगाने पक्षाचा राष्ट्रीय दर्जाचा काढून घेतल्यानंतर पक्षाचा महाराष्ट्रासह इतर राज्यात विस्तार कसा करायचा, यावर प्रामुख्याने चर्चा होण्याची शक्यता आहे.

पूर्वोत्तर राज्यांमधील नागालँड विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ सदस्य निवडून आलेले आहेत. हे सदस्य स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याप्रकारे इतर राज्यांमध्ये सुद्धा पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT