Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: राष्ट्रवादीचा लोकसभेसाठी पहिला उमेदवार ठरला! शरद पवारांनी कामाला लागण्याचे दिले आदेश

शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढणार

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. राज्यातील सर्व पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केले आहेत. तर राष्ट्रवादीचे स्टार म्हणून ओळख असणारे खासदार अमोल कोल्हे या निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. तर शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती आज समोर आली आहे. अमोल कोल्हेच लोकसभेचे उमेदवार असणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी दिली आहे.(Latest Marathi News)

शरद पवारांनी आज आढावा बैठक घेतली या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभा निवडणूक लढणार आहेत. अमोल कोल्हेंना पुन्हा निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश शरद पवार यांनी या बैठकीत दिले आहेत.(Latest Marathi News)

तर यावर प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे म्हणाले की, शरद पवारांनी आज बैठक घेतली. राष्ट्रवादीच्या नेत्यांशी-पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी एकूण कामकाजाचा आढावा घेतला. त्यांना मी मागील चार वर्षांच्या काळातील कामकाजाबद्दल माहिती दिली, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे. तर पवारसाहेबांनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण अंतिम निर्णय योग्यवेळी ते घेतील. साहेब सांगतील ते धोरण, अन् साहेब बांधतील ते तोरण!, असंही कोल्हे म्हणालेत.(Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भोसरीमध्ये पोस्टरबाजी पाहायला मिळाली यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तर आम्ही कामाला लागलो आहोत योग्य तो निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील अंस त्यांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT