jayant patil  esakal
महाराष्ट्र बातम्या

CM शिंदेंनी बाहेर पडायला हवं होतं; जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत निती आयोगाच्या बैठकीत सहभागी झाले, दरम्यान निती आयोगाच्या बैठकीनंतर झालेल्या फोटो सेशन वरुन राज्यात नवा वाद पेटला आहे. या फोटोमध्ये मुख्यमंत्री शिंदे शेवटत्या रांगेत उभे राहिल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

जयंत पाटील यांना पंतप्रधान मोदींची तुलना थेट औरंगजेबासोबत केली आहे, ते म्हणाले की, औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज यांना दुसऱ्या ओळीत स्थान देण्यात आले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी तिथून बाहेर पडायचा निर्णय घेतला होता, त्यामुळे आज एकनाथ शिंदे यांनी बाहेर पडणे गरजेचे होते, असे म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना पाटील पुढे म्हणाले की, जर भारतात न्याय शिल्लक असेल तर तो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात दिसून येईल. नसेल तर ते ही निकालातून कळेलच. तसेच आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या ओळीत उभं राहावं लागल्याबद्दल बोलताना पाटील म्हणाले की, औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजाना दुसऱ्या रांगेत उभ केलं तर त्यांनी ती सभा सोडली. मुख्यमंत्र्यांनी याची आठवण ठेवावी. मी केवळ उदाहरण सांगितलं. मी कुणालाही औरंगजेबाची उपमा दिली नाही. ती सभा मोदींची होती मला नवा वाद उभा करायचा नाही . प्रोटोकॅाल नुसार अल्फाबेट नुसार अरेंजमेंट असते, असंही ते म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची सातवी बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यानंतर झालेल्या फोटो सेशनमध्ये मुख्यमंत्र्यांना शेवटच्या ओळीत उभं केल्यावरून राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी टीका केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT