NCP Jayant Patil On bhagat singh koshyari ramesh bais appointed as new governor of maharashtra 
महाराष्ट्र बातम्या

Governor of Maharashtra : नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे…; कोश्यारी पायउतार होताच राष्ट्रवादीची खोचक टीका

सकाळ डिजिटल टीम

Governor of Maharashtra : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वागग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच आनंतर आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कोश्यारी यांच्या जागी रमेश बैंस यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्यात नवीन राज्यपालांच्या नावाची घोषणा होताच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी आशा करूयातअसे ट्विट त्यांनी केलं आहे .

तसेच जयंत पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा- सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो! असेही म्हटले आहे.

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो असेही जयंत पाटील म्हणाले आहेत. दरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी याशिवाय देशातील 13 राज्यांचे राज्यपालही बदलण्यात आले आहेत.

नवीन नियुक्ती झालेले राज्यपाल आणि उपराज्यपाल

  • लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश

  • लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्कीम

  • सी. पी. राधाकृष्णनन, राज्यपाल, झारखंड

  • शिवप्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश

  • गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसाम

  • निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश

  • बिस्वा भूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगढ

  • अनुसुईया उईके, राज्यपाल, मणीपूर

  • एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड

  • फागू चौहान, राज्यपाल, मेघालय

  • राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार

  • मेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र

  • निवृत्त ब्रिगेडियर बी. डी. मिश्रा, उपराज्यपाल, लडाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT