Jayant Patil 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar News : शरद पवारांच्या जातीच्या दाखल्यावर अजूनही चर्चा सुरूच; जयंत पाटलांचे स्पष्टीकरण देत गंभीर आरोप

सोशल मीडियावर शरद पवार यांचा कथित जातीचा दाखला व्हायरल देखील होत आहे

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बद्दल सोशल मीडियावर त्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा दावा केला जात आहेो . इतकेच नाही तर शरद पवार यांचा कथित जातीचा दाखला व्हायरल देखील होत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राज्याच्या राजकारणात सध्या शरद पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शरद पवारांचा शाळा सोडल्याचा दाखला आहे आणि तो मराठा म्हणून आहे असे जयंत पाटलांनी स्पष्ट केलं.

जयंत पाटील म्हणाले की, मुद्दाम प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि लोकांमध्ये शरद पवार यांच्याबद्दल गैरसमज पसरवून त्यांना बदनाम करण्याचा उद्योग केला जात आहे. पवारांचा खोटं ओबीसी सर्टिफीकेट दाखवण्याचा प्रयत्न प्रसार माध्यमे आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून होतोय.

महाराष्ट्रातील जनतेला शरद पवार साहेबांबद्दल गैरसमज पसरवणे, त्यांची बदनामी करणे आणि त्यांनी मागच्या काळात काय केलं असा चुकीचा प्रश्न विचारणे आणि त्यांचं ओबीसी प्रमाणपत्र प्रसिद्ध करणे हे बदनाम करण्यासाठीचे षडयंत्र आहे. तसेच हा मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

पवार साहेंबांचं शाळा सोडल्याचं प्रमाणपत्रावर मराठा असा उल्लेख आहे. त्यामध्ये बदल करून कोणी काहीही दाखवत असेल, तर तक्रारी पवार प्रेमी करत आहेत. त्यामुळे त्याला ते तोंड देतील असेही जयंत पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT