NCP Jayant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil : राष्ट्रवादीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण? जयंत पाटलांचं सूचक विधान

त्यांनी माझी चांगली मिमिक्री केली, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंचं कौतुकही केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात आगामी काळात होणारी निवडणूक आणि त्या अनुषंगाने विविध विषयांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार, या प्रश्नाचंही त्यांनी उत्तर दिलं आहे. तसंच राज ठाकरेंचं कौतुकही केलं आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आलं तर मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर जयंत पाटील म्हणाले,"राज्यात आगामी काळात होणारी निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. या निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटप होणार आहे. त्यात सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट करायचा आमचा प्रयत्न असेल."

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

मुख्यमंत्रीपदाविषयी बोलताना जयंत पाटील म्हणाले, "या निवडणुकीनंतर सत्तेत महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. पण मुख्यमंत्री कोण होणार हे संख्याबळावर ठरेल. संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे पद आलं तर मुख्यमंत्री कोण होणार हे पवार साहेबच ठरवतील. त्यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असेल. "

जयंत पाटलांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं कौतुकही केलं आहे. ते म्हणाले, "माझी आणि राज ठाकरेंची फारशी ओळख नाही. मी त्यांना फक्त टीव्हीवर बघतो. पण त्यांनी माझी मिमिक्री चांगली केली होती. त्यांची भाषणंही चांगली असतात."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT