Jitendra Awhad sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis : शरद पवार बोलून दाखवत नाहीत, पण...; सुनावणीबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक, म्हणाले...

रोहित कणसे

पक्षामध्ये पडलेल्या फूटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळावे यासाठी संघर्ष सुरू आहे. हा लढा केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. यादरम्यान शरद पवार हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला. यावर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. यावेळी ते भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.

निवडणुक आयोगासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान अजित पवार गटाच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादादरम्यान शरद पवारांवर अनेक आक्षेप घेण्यात आले. याबद्दल बोलताना आव्हाड म्हणाले की, साहेब स्वतः दोन तास निवडणुक आयोगाच्या ऑफिसमध्ये बसून होते, ते बोलून दाखवत नाहीत पण त्यांनाही भावनिक हल्ला झाल्यासारखं वाटलं. ज्या माणसाने आयुष्यभर लोकशाही मुल्यांचा आदर केला. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एक तासही ते त्या घरात कधी राहिले नाहीत.

ज्यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर सर्वांना संधी मिळाल्या. साडे अठरा वर्ष लोकं मंत्री राहिले. तीच लोकं शरद पवारांनी पक्षात लोकशाही ठेवलीच नाही असं म्हणत आहेत. एकाधिकारशाहीसारखे वागले, हुकूमशाहासारखे वागले असे म्हणत आहेत. म्हणजे मला त्या वकिलाचं बोलणं ऐकून आपण कशासाठी लढतोय असं वाटलं... कुठली नीती, कुठली मुल्य... हे घरात बसल्यानंतर यांना फोन येणार की तुम्हाला अमूक-अमूक मंत्री केलंय, जा शपथ घ्या. या सगळ्या भावनिक स्वातंत्र्याचं काय फळ मिळालं, तर ते हुकूमशाह आहेत? महाराष्ट्रातील एका व्यक्तीला तरी हे पटतंय का सांगा, असा सवाल आव्हाड यांनी केला.

एवढंच होतं तर शरद पवारांना सोडून जायचं होतं आणि सांगायचं होतं तुम्ही लोकशाहीवादी नाहीयेत, आम्हाला तुमच्या पक्षात राहायचं नाहीये. आम्ही स्वतंत्र पक्ष काढतो. त्यांच्या हतातलं बाळ आता वाढल्यासारखं झालंय, ते मोठं होतंय. ते झाड तुम्ही उपटून टाकण्याचा प्रयत्न करत आहात. हे राजकारण आहे म्हणून समजू शकतो.

पण काल जे काही वकीलांमार्फत बोलण्यात आलं, ते सहन न होणारं होतं आणि इतकं असंवेदनशील होणं हे... ज्यांनी त्यांच्याकडून सगळं घेतलं त्यांना शोभत नाही असेही आव्हाड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT