Jitendra Awhad: Controversial statement on shree ram Sakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: बोलण्याच्या ओघात बोलून गेलो, पण वाल्मिकी रामायणमध्ये...; जितेंद्र आव्हाड स्पष्ट बोलले

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या रामाविषयीच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुन आज पत्रकार परिषद घेऊन आव्हाडांनी स्पष्टीकरण दिलं आहे

कार्तिक पुजारी

मुंबई- शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या रामाविषयीच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुन आज पत्रकार परिषद घेऊन आव्हाडांनी स्पष्टीकरण दिलं आहे. काल बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो. पण, वाल्मिकी रामायणमध्ये हे लिहिलं आहे, असं म्हणत त्यांनी खुलासा केला आहे.

पुराणामध्ये हे लिहिलं आहे. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. पण, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. आजकाल लोकांच्या भावना महत्त्वाच्या झाल्या आहेत. आमचा राम हृदयात आहे, तर त्यांचा राम बाजारात आहे. राम हा बहुजणांचा आहे. तो क्षत्रीय होतो. तो आमचा आहे, असं आव्हाड म्हणाले.

रामयण वाचा, त्यात अयोध्या कांडमध्ये ५४ व्या ओवीमध्ये याचा उल्लेख आहे. पण, लोकांच्या भावनाचा आदर करुन मी खेद व्यक्त करतो आहे. माझ्याकडचे पुरावे वाचा. हे मी लिहिलेले नाहीत. मी जे बोलतो ते अभ्यास करुन बोलतो. खटल्यांना मी घाबरत नाही. राम कदमांनी रामायण किती वाचलंय माहिती नाही, मुली उचलणाऱ्यांनी मला शिकवू नये, असं म्हणत त्यांनी टीका केली.

कधी कधी भाषण करत असताना आपण काही बोलून जातो. मी खेद व्यक्त करतो. आता का फाशी घ्यावी का? सामाजिक विषयावर भाष्य करण्याची मुभा आम्हाला पक्षाने दिली आहे. मी कधी इतिहासाचा विपर्यास करत नाही. या वक्तव्याशी पक्षाचा संबंध नाही. आम्हीही रामाला मानतो, मी राम मंदिराला जाणार आहे. पण, आमचा राम बहुजनांचा आहे. शबरीला शोधणारा आमचा राम आहे, असं आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी रोहित पवार यांच्यावरही टीका केली आहे. रोहित पवार अजून लहान आहेत. त्यांच्या वक्तव्याला मी महत्व देत नाही, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे. रोहीत पवार यांनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका केली होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT