NCP Jitendra Awhad slam BJP Chandrashekhar Bawankule over dr babasaheb ambedkar jayanti poster  
महाराष्ट्र बातम्या

"बावनकुळे साहेब तुम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष आहात…हे पोस्टर तुम्हाला मान्य आहे का?"

रोहित कणसे

महाराष्ट्र तसेच देशात ६ एप्रिल रोजी हनुमान जयंती मोठ्या उत्साहत साजरी करण्यात आली. तेसेच येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी केली जाणार आहे. यानिमीत्ताने लावण्यात आलेल्या एका पोस्टरवरून नवा वाद सुरू झाला आहे.

हनुमान जयंती निमीत्त राजकीय नेत्यांकडून जागोजागी पोस्टर्स आणि बॅनर्स लावून नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या. यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुठे यांचा फोटो असलेल्या एका आक्षेपार्ह पोस्टरचा फोटो शेअर करत हा काय घाणेरडा प्रकार आहे, असा सवाल केला आहे.

नेमकं काय घडलं?

आव्हाडांनी शेअर केलेला हा फोटो हा एका पोस्टरचा असून यावर हनुमान जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमीत्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मात्र या पोस्टरवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोच्या वरती लावण्यात आला आहे. आव्हाडांनी हा बॅनरवरील प्रकार दाखवून देत संताप व्यक्त केला आहे.

आव्हाड नेमकं काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केलं आहे की, "हा काय घाणेरडा प्रकार आहे, बावन्नकुळे साहेब तुम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष आहात... हे पोस्टर तुम्हाला मान्य आहे का" असा सवाल सत्ताधारी पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारला आहे. या ट्वीटनंतर चर्चेला उधाण आलं आहे.

लोक काय म्हणत आहेत?

दरम्यान आव्हाडांच्या या ट्वीटवरती अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये अनेकांनी बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे. तसेच सदर पोस्टर ज्याने बनवले आहे, त्यावर कारवाई करण्यात यावी यामुळे कोणाच्याही मनभावना दुभावल्या जाऊन वाद होतील असे म्हटले आहे. तर तर काही वापरकर्त्यांनी आव्हाडांना कशाला छोटी गोष्ट मोठी करत आहात, या घटनेची दखल आधीच घेतली गेली आहे असे देखील सांगितले जात आहे.

सोशल मीडियावर चर्चेला उधाण

आव्हाडांच्या या पोस्टवर नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यामध्ये कशाला छोटी गोष्ट मोठी करत आहे, या घटनेची दखल आधीच घेतली गेली आहे , बावनकुळे साहेबांनी स्वतःच्या सहिने बॅनर लावले, बॅनरचे 350 रुपये स्वतः दिले असे आपले म्हणणे आहे का? कुठे काय राजकीय फायदा घ्यावा हे सर्वांनी आपल्याकडून शिकावे, अशी टीका देखील आव्हाडांवर केली जात आहे.

तसेच त्यांनी ते बॅनर लावले ते तिथल्या स्थानिक पाचशे लोकांना दीसले असेल... हे महाशय त्या बॅनरला करोडो लोकांपर्यंत पोहचवताय.. खरा अपमान कोण जास्त करतय मग? असा सवाल देखील एका वापरकर्त्याने आव्हाडांना विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT