Ajit Pawar And Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: “…तोपर्यंत एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाईल”, ‘त्या’ विधानावरून अजित पवारांचा खोचक टोला!

अजित पवारांनी 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला

अंकिता खाणे (Ankita Khane)

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न निवडणूक आयोगाकडे मांडू असं म्हणाले होते. तसेच महिला सशक्तीकरणाबाबत बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख त्यांनी पंतप्रधान असा केला होता. त्यानंतर अनेकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. दरम्यान, यावरून आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे.

'सकाळ' माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवरही भाष्य केलं आहे.

अजित पवार बोलताना म्हणाले की, “अनुभव नसला की मी-मी म्हणणारे सुद्धा चुकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पंतप्रधान म्हटले होते. तर, राज्य लोकसेवा आयोग (एमपीएसीचा) प्रश्न निवडणूक आयोगाकडे मांडू असं म्हटलं होतं. ते आता अनुभवातून शिकतील. मात्र, जोपर्यंत अनुभव येतील ते शिकतील तोपर्यंत त्यांचे मुख्यमंत्री पद जाईल”, असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत आमच्या कानावर सातत्याने काही गोष्टी येत होत्या. महाविकास आघाडीचे सरकार आल्याच्या पहिल्या दिवसापासून हे सरकार पाडण्यासाठी भाजपाचा प्रयत्न होता. उद्धव ठाकरेंनी शिंदेंना ठाण्यातील अधिकारी नेमण्याचे सर्वाधिकार दिले होते".

"बंडखोरीच्या वेळेस उद्धव ठाकरे यांनी आमदार जिथे असतील. तेथून त्यांना ‘मातोश्री’वर आणण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पण, अधिकाऱ्यांनी शिंदे यांच्यासोबत निष्ठा ठेवत त्यांच्यासह आमदारांना सुरळीतपणे मुंबईबाहेर जाऊ दिले”.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT