ajit pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: दौरे रद्दच्या अफवेनंतर अजित पवार अॅक्शन मोडमध्ये

अजित पवार नियमितपणे विधानभवनातील कार्यालयात उपस्थित राहणार

अंकिता खाणे (Ankita Khane)

नियोजित कार्यक्रम अचानक रद्द केल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत राजकीय तर्कवितर्कांना काल पुन्हा उधाण आले होते. मात्र आज मंगळवारी ( ता.१८) ते नियमितपणे विधानभवनातील कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करत अजित पवार यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

अजित पवार भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. महाविकास आघाडीच्या नागपूरच्या सभेत भाषण न करणे, आज अचानक सासवड येथील शेतकरी मेळाव्याचा दौरा रद्द करून एकांतात राहणे., यावरून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली.

त्यातच सत्ताधारी पक्षातील काही प्रमुख नेत्यांनी अजित पवार भाजपमध्ये आले तर स्वागतच आहे अशी वक्तव्य करून या चर्चांना हवा दिली. तर खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणाचा दबाव टाकला जात असून त्यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे राजकारण शिजत असल्याचा दावा केला.

अजित पवार यांनी मात्र आज स्वतः खुलासा करताना नाराजीचे कारणच नसल्याचे सूतोवाच केले. एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, खारघर येथे काल झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबीयांना आणि उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्री सदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’रुग्णालयामध्ये आज पहाटेपर्यंत उपस्थित होतो. माझा कोणताही नियोजित कार्यक्रम आज नव्हता, मी मुंबईतच आहे. मंगळवारी (ता. १८) मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमीत कामकाज सुरु राहणार आहे.

काही आमदारांचे उघडपणे समर्थन

‘‘अजित पवार आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पुढे वाटचाल करेल असा विश्वास दाखवत त्यांच्या कोणत्याही निर्णयाला आमचा पाठिंबा असेल. त्यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्णत: विश्वास आहे,’’ असे विधान माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा आणि अण्णा बनसोडे यांनी आज जाहीररीत्या केले. अजित पवारांना आमदारांनी उघडपणे पाठिंबा देण्याची ही पहिलीच वेळ आहे.दरम्यान, आज (ता १८) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना इफ्तारनिमित्त मुंबईत आम्ही भेटण्यास येत असल्याचे खासदार फौजिया खान यांनी आज जाहीर केले.

राष्ट्रवादीला खिंडार?

राष्ट्रवादी काँग्रेसला येत्या काहीच दिवसात खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे. पण पक्षांतर करणारा हा गट अजित पवार यांचा नसून अनेक वरिष्ठ नेते पक्षांतर करणार असल्याची माहिती ‘साम टीव्ही’ला सूत्रांनी दिली आहे. यामध्ये मंत्रिपदे भोगलेल्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश असल्याचे समजते.

गेले काही काळ वारंवार होणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या छाप्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमधील एका गटात अस्वस्थता पसरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार नाराज असल्याचा चर्चांना देखील उधाण आले होते. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल दहा जण भाजपच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. हे सगळे ज्येष्ठ नेते असून महत्त्वाची खाती बजावलेले बहुतांश पश्चिम महाराष्ट्रातील नेते आहेत.

‘आमदारांची बैठक बोलावलेली नाही’

मी उद्या आमदारांची बैठक बोलाविल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी. असे आवाहन देखील त्यांनी पत्रकातून केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

Latest Marathi News Live Update : फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतूक आज काही वेळासाठी बंद करण्यात येणार

Panchang 3 October 2025: आजच्या दिवशी अर्गला स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT