NCP leader Ajit Pawar on uniform civil code in nashik Visit Maharashtra politics news  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar on UCC : …ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ; भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांनी स्पष्ट केली समान नागरी कायद्याबाबातची भूमिका

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांन बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २ जुलै रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. शिंदे-फडणवीस सरकारचे विरोधक असलेले अजित पवार अचानक सत्तेत सहभागी झाल्याने राजकीय वर्तुळात अजित पवारा वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

यादरम्यान अजित पवारांनी सध्या चर्चेत असलेल्या समान नागरी कायद्यासंबंधात त्यांच्या गटाची काय भूमिका असेल याबद्दल भाष्य केलं आहे.

मागील काही दिवसांपासून देशात समान नागरी कायदा लागू करण्याबाबत केंद्र सरकारकडून वेगाने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. हा कायदा लागू करण्याबाबत अजित पवारांनी त्यांच्या गटाची भूमिका स्पष्ट केला आहे. अजित पवार शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

२ जुलै रोजी शिवसेना आणि भाजप यांच्यासोबत हातमिळवणी करत सत्तेत सामील झालेले अजित पवार म्हणाले की, समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट आम्ही सगळ्यांनी पाहिला की, त्या संदर्भातील आमची भूमिका मांडू, पण सध्या ड्राफ्ट नाहीये आणि नुसती चर्चाच चाललीय. इथून पुढे काम करताना या देशातील संविधानाचा आदर करताना कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही याबद्दलची आमची पहिल्यापासून भूमिका आहे. याच भूमिकेचं समर्थन करत आम्ही पुढे जाणार आहोत असे अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आतापर्यंत ९ वर्षांचा पंतप्रधान मोदी यांचा कारभार पाहिला तर ३७० कलम काढून टाकलं, चांगली गोष्ट झाली असे काही निर्णय झाले आहेत. समान नागरी कायद्याची चर्चा खूप होतेय, पण मला त्याचा ड्राफ्ट आल्यानंतर मला पाहायचा आहे. तो संपूर्ण देशाच्या भल्याचा असेल तर आपण त्या दृष्टीने विचार करू. त्यात काही अडचण असेल तर ती चर्चा करून दूर करता येईल. शेवटी १४०-१४५ कोटी जनतेच्या देशाचे प्रतिनिधीत्व करत असताना कुठल्याच घटकाला वंचित ठेवून चालणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: नोकरीमध्ये मराठी माणसाला स्थान नाही : संजय राऊत

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

SCROLL FOR NEXT