Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: राजकीय घडामोडींना वेग आला असताना अजित पवार घेणार CM शिंदे अन् फडणवीसांची भेट

अजित पवार या भेटीचं कारणही आलं समोर

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासुन राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी अजित पवार 7 आमदारांसह नॉट रीचेबल झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका ट्विटमुळे खळबळ उडाली. राज्याचा सत्तासंघर्षावर अद्याप सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणे बाकी आहे. यादरम्यान राज्यात राजकीय उलथापालथ होणार अशी चर्चा सुरू असताना दामानिया यांचं ट्वीट चांगलंच चर्चेत आलं आहे.

त्यानंतर काल उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. काल उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर जाऊन त्यांची भेट घेतली आहेत. या भेटीवेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत उपस्थित होते. या सर्व घडामोडी घडत असतानाच आज अजित पवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत. या भेटीचं कारणही समोर आलं आहे.

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिकं आडवी झाली. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट होणार असून अजित पवार विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने आणि गरपिठीने धुमाकूळ घातला असून शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. केळी, द्राक्ष, आंबा संत्रा या फळबागांना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. तर हरभरा, गहू, ज्वारी भाजपाला पिकांचेही मोठे नुकसान यामध्ये झाले होते. या नुकसानीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने मदत जाहीर करावी यासाठी अजित पवार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT