ajit pawar narendra modi 
महाराष्ट्र बातम्या

सीमा भागातील मराठी बांधवांसाठी अजित पवारांचे पंतप्रधानांना पत्र

सकाळ वृत्तसेवा

उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. सीमा भागातील मराठी बांधवावर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे सीमा भागातील मराठी बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. बेळगाव कारवार संयुक्त महाराष्ट्र बाबत केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी. मराठी बांधवांवरील अन्याय थांबवून सीमाभागातील मराठी भाषक गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा असे आवाहन अजित पवारांनी पत्रात केले आहे. (Maharashtra Latest News)

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा भागातील मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारकडून अन्याय होत असल्याचा आरोप होत आला आहे. मराठी भाषिक लोकांनी याबाबत अनेकदा आवाज उठवला आहे. या मुद्द्यावरुन अनेकदा आंदोलनं होतात, पण त्यांना अद्याप न्याय मिळू शकलेला नाही. राज्या-राज्यांमधील हा वाद असल्याने केंद्राला यात हस्तक्षेप करता येते. त्यामुळे अजित पवार यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. सीमाभागातील बांधवांना न्याय मिळावा यासाठी येथील मराठी नागरिक पत्रे लिहून पंतप्रधानांना विनंती करत आहेत. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्याने मी देखील या मागणीला पाठिंबा देत असून त्यांची मागणी मान्य करावी, अशी विनंती अजित पवारांनी या पत्राद्वारे पंतप्रधानांना केली.

सीमाप्रश्नाची लढाई ही महाराष्ट्राच्या वतीने जनतेच्या मनात आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे. सीमाभागातील मराठी भाषकांची आणि महाराष्ट्राची बाजू न्यायोचित असल्याने दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचाच विजय होईल, अशी खात्री अजित पवारांनी व्यक्त केली. बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हे प्रत्येक महाराष्ट्रवासियाचे स्वप्न आहे, हा महाराष्ट्र सरकार व जनतेचा दृढनिर्धार आहे. तो पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही. विधायक मार्गाने न्यायासाठीचा लढा सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT