Amol Kolhe Esakal
महाराष्ट्र बातम्या

Amol Kolhe: "आधी आभाळ बघायचं, वारं बघायचं मग..."! अमोल कोल्हेंचं सूचक वक्तव्य

आगामी लोकसभा निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढणार? अमोल कोल्हेंचं सूचक वक्तव्य

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यानंतर त्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेट घेतली होती. अमोल कोल्हे राजकीय प्रश्नावर स्पष्टपणे बोलत नाहीत अशा चर्चा वारंवार सुरू असतात.

अशातच लोकसभा निवडणूक लढवणार का? लढवणार तर कोणत्या पक्षाकडून लढवणार? तुम्ही राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा आहेत, त्यात किती तथ्य आहे? असे प्रश्न विचारल्यावर अमोल कोल्हे हे मिश्किल उत्तरे देतात. त्यामुळे अमोल कोल्हे राष्ट्रवादीत राहणार की भाजपमध्ये जाणार? या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

शिरूरचे खासदार अमोल कोल्हे हे आगामी लोकसभा निवडणूक लढणार की नाही? तसेच भाजपमधून की राष्ट्रवादीतून लढवणार? याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर अमोल कोल्हे यांनी सूचक असं वक्तव्य केलं आहे. 'आधी आभाळं बघायचं, वारं बघायचं अन् मग नांगरायला घ्यायचं. त्यामुळे उद्याची निवडणूक लढायची की नाही ते आता कशाला सागायचं?' असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

अमोल कोल्हे यांनी केलेल्या या सूचक विधानामुळे कोल्हे राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

अमोल कोल्हेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं. त्यावर त्यांना पत्रकारांनी प्रश्न केला असता त्यांनी उलटा माध्यमांना प्रश्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं याचा अर्थ भाजपमधून ऑफर आहे असा होतो का? असं कोल्हेंनी म्हंटलं आहे. कराड येथे होणाऱ्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाटयाच्या कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी आले असता खासदार अमोल कोल्हे माध्यमांशी बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surat Police Viral Video : पोलीस कर्मचारी ठरला देवदूत ! जीव धोक्यात घालून सातव्या मजल्यावर चढला अन् तरुणाचे वाचवले प्राण, व्हिडिओ व्हायरल

Jalna Crime: शिक्षकच ठरला भक्षक! विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून अत्याचार; जालन्यात शिक्षक अटकेत, शिक्षणाच्या मंदिरातच घडला संतापजनक प्रकार

Jowar Price Hike : भाकरी महागली... ज्वारी 50 पार; बार्शीच्या शाळू ज्वारीने गाठला प्रतिकिलो 80 रुपयांचा दर

दोन सहकारी अन् मित्राच्या त्रासाला कंटाळून TCS मधील आयटी अभियंत्यानं संपवलं जीवन, चिठ्ठीत गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : उदगीर-अहमदपूर मार्गावर एसटी बस पलटी; प्रवाशांची थरारक सुटका

SCROLL FOR NEXT