Anil Deshmukh  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Anil Deshmukh: देशमुखांना जामीन पण सुटका नाही? CBIकडूनही गुन्हा दाखल

दत्ता लवांडे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अनिल देशमुख (NCP Leader Anil Deshmukh) यांना ईडीकडून दाखल गुन्ह्यात मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे पण त्यांच्या सुटकेवर संभ्रम निर्माण झाला आहे. कारण त्यांच्यावर अगोदरच सीबीआयकडून गुन्हा करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना सीबीआयकडून दाखल गुन्ह्यातही लगेच जामीन मिळणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या निर्णयाकडे लक्ष लागलेले आहे.

(Anil Deshmukh Bail Latest Updates)

दरम्यान, 100 कोटींच्या वसुलीचा आरोप असलेल्या देशमुख यांनी ईडीने अटक केली होती. नोव्हेंबर 2021 पासून जवळपास 11 महिने अनिल देशमुख यांनी तुरुंगात काढले असून त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. देशमुख यांना 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर न्यायालयाने या प्रकरणात चौकशीचे आदेश दिल्यानंतर सीबीआयनेही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे या गुन्ह्यातही त्यांना जामीन मिळणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अनिल देशमुख यांच्यावर कोणते आरोप?

अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अटकेत असलेले माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी 100 कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता. परमबीर सिंह यांनी पत्रातून हे आरोप केले होते. या प्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले.

सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाई केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT