Chhagan Bhujbal on Eknath Shinde
Chhagan Bhujbal on Eknath Shinde 
महाराष्ट्र

PM मोदी तुकारामांच्या भेटीला आले अन् एकनाथाला घेऊन गेले : भुजबळ

निनाद कुलकर्णी

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात कालपासून राजकीय भूकंपाचे वारे वाहू लागले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह साधारण 46 आमदार फुटल्याच्या मार्गवर आहेत. त्यात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मोठं विधान केले आहे. राजकारणी आहोत त्यामुळे सर्वच पक्षांनी नेहमी निवडणुकांसाठी तयार राहिले पाहिजे असे म्हटले आहे. यावेळी भुजबळ यांनी नरेंद्र मोदींबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) तुकारामांच्या भेटीला देहुत आले आणि एकनाथाला घेऊन गेले असेही छगन भुजबळ म्हणाले. (Chagan Bhujbal On Maharashtra Government)

आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी सेनेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही एकनाथ शिंदेंना फोन कॉल केल्याचं सांगितलं. दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती राऊतांनी दिली. (Maharashtra Political Crisis) सध्या राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने असल्याचं ट्वीट राऊत यांनी केलं आहे. यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचं स्पष्ट झालंय.

राज्यात नवं सरकार येणार; नितेश राणेंचं ट्वीट

संजय राऊत यांना संविधान आणि त्यातील तरतुदी कळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. निवडणुका होणार, असे घाबरवून आमदारांना धमक्या काय देताय? सरकार वाचविण्यासाठी? चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार, विकास पर्व पुन्हा नव्याने सुरू होणार! असे ट्वीट नितेश राणेंनी (Nitesh Rane) केलं आहे.

काँग्रेसचा एकही आमदार फुटलेला नाही - थोरात

या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेसचे सर्वच्या सर्व आमदार पक्षासोबतच असून, एकही आमदार फुटला नसल्याचा दावा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. तसेच काँग्रेसमध्ये कुठलीही अडचण नसून, सर्व आमदारांना मुंबई दाखल होण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, एक वाजता मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार असून, यामध्ये मविआ सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबातच्या बैठकीचा अजेंडा अद्याप तयार झालेला नसल्याचे सांगितले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस; महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळीनं झोडपलं

SCROLL FOR NEXT