Chhagan Bhujbal 
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal: सुप्रिया सुळे बहिणीसारख्या, त्यांची इच्छा पूर्ण करतोय; छगन भुजबळांचा पलटवार

कार्तिक पुजारी

मुंबई- शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी पलटवार केला आहे. सुप्रिया सुळे या माझ्या बहिणीप्रमाणे- मुलीप्रमाणे आहेत. त्या म्हणाल्या होत्या की अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास मी पहिल्यांदा त्यांना जाऊन हार घालणार आहे. त्यांची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत, अशी टिप्पणी भुजबळ यांनी केली आहे.

अजित पवार हे मुख्यमंत्री झालेले मला आवडेल. ते मुख्यमंत्री झाले तर मी सगळ्यात अगोदर जाऊन त्यांना हार हालणार असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. यावरुन छगन भुजबळ यांनी टोला लगावला आहे. सुप्रिया सुळे या मला बहिणीसारख्या किंवा मुलीसारख्या आहेत. त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करणे आमचं काम आहे. त्यासाठीच आम्ही प्रयत्न करत राहू, असं भुजबळ म्हणाले.

मिटिंग घेण्याचा आणि चर्चा करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची इच्छा आहे. पण, इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्यात यावे. ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. माझ्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा शरद पवार यांचीही हीच भूमिका असल्याचा पुनरुच्चार भुजबळांनी केला. ते पत्रकारांची बोलत होते.

छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या दाव्यामुळे सध्या राज्यात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यांनी शब्द पाळला नाही. त्यानंतर अजित पवारांनी हा शब्द पाळला. शरद पवार आणि अजित पवारांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चर्चा केली होती. पण, नंतर शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं टाळलं, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT