महाराष्ट्र

कपडे सोडून सगळं काही जप्त केलं : भुजबळ

सकाळवृत्तसेवा

परभणी : मला तुरुंगात डांबल्याबद्दल खंत नाही, खोटे आरोप लावणाऱ्यांनो तुम्ही काही संत नाहीत. फुले-शाहू -आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आहेत, जातीयवादी महंत काही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तसेच तुरुंगात टाकल्यानंतर भुजबळ कुटुंबाचा चौकशीच्या नावाखाली अतोनात छळ करण्यात आला. कपडे सोडून सगळं काही जप्त केले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारी (ता.25) बहुजन जागृती समता मेळावा पार पडला. यावेळी भुजबळ बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, महापौर मीना वरपुडकर, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, आमदार रामराव वडकुते, आमदार विजय भांबळे, माजी खासदार सुरेश जाधव, अॅड.गणेशराव दुधगावकर, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला राठोड, उपाध्यक्षा भावना नखाते, राजेश विटेकर, प्रताप देशमुख, स्वराजसिंह परिहार, मीना राऊत, चक्रधर उगले, अनिल गोरे आदी उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले, सरकारने भुजबळ कुंटुबांचा नाहक छळ केला असून, महाराष्ट्र सदन बांधणाऱ्या कंत्राटदाराला अद्याप एकही रुपया दिलेला नसताना गैरव्यवहार झाला कसा म्हणता असा प्रश्न करत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. मला तुरुंगात का टाकण्यात आले, हे मला आणि ज्यांनी टाकले त्यांनाही अजून माहिती नाही. ज्या महाराष्ट्र सदन बांधकामातील गैरव्यवहाराचे आरोप माझ्यावर करण्यात आले. त्या बांधकामाचे कंत्राट संबंधित कंत्राटदाराला मी नव्हे तर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळाने दिले होते. माझी केवळ त्या खात्याचा मंत्री म्हणून भूमिका होती. सदन बांधून पूर्ण होऊन चार ते पाच वर्षे होत आहेत. आपणावर झालेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले. तुरुंगात टाकल्यानंतर भुजबळ कुटुंबाचा चौकशीच्या नावाखाली अतोनात छळ करण्यात आला. कपडे सोडून सगळं काही जप्त केले, असा आरोप त्यांनी केला आहे.

ते म्हणाले, तुम्ही कितीही दादागिरी करुन संपवायला निघाला असलात तरीही भुजबळ संपणार नसल्याचे सांगत सरकारला त्यांनी आव्हान दिले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची नक्कल करत त्यांच्यावरही टीका केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचाही त्यांनी समाचार घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT