eknath khadse E Sakal
महाराष्ट्र बातम्या

खडसेंनी डागली तोफ, गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा...

जळगावात शरद पवारांच्या उपस्थितीत वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : दोन-चार लोकांना आत टाकलं असतं तर ही परिस्थिती उद्भवली नसती असा घणाघात राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलाय. जळगावमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपा आणि फडणवीसांवर टिका केली. माझेच पाय धरणारे हात-बोट धरणारे पोरं आज मला शिकवायला लागलेत, पवार साहेबांवर बोलायला लागले याचं मला आश्चर्य वाटतंय.. .असं म्हणत फडणवीसांनी शरद पवार आणि एनसीपी बद्दल केलेल्या ट्वीटला उत्तर दिलं. ( Eknath Khadse ask Home ministry to show power against BJp)

शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांवर होणारी EDची कारवाई , महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते संजय राऊत तसंच मुख्यमंत्र्याच्या कुंटुबियांवर देखील झालेल्या कारवाई या सर्वांना उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी , गेल्यावर्षीच जर दोन -चार जणांना आत टाकलं असतं तर ही परिस्थिती उद्भवली नसती. दिलीप वळसे पाटलांनी गृहमंत्रीपदाचा हिसका, इंगा दाखवावा असा घणाघात केलाय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी 14 ट्विट करत, राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. काश्मिर फाईल्स, आर्टीकल 370, मुस्लिम आरक्षण, मुंबई दंगल, नवाब मलिक अशा विषयांवर पवार आणि NCP ला लक्ष करणारे ट्विट केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''आम्ही उघडपणे वाल्मिकअण्णांचं समर्थन करतो, त्यात चुकीचं काहीही नाही'', बॅनर झळकलेला संदीप तांदळे नेमकं काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : डोंबिवलीत सर्पदंश मृत्यू प्रकरणावर संतप्त नातेवाईक आणि नागरिक रस्त्यावर

Viral: 'ये हिरो डोक्याची गोळी घे पण ऑफिसला ये' बॉस आणि कर्मचाऱ्याचं चॅट व्हायरल, म्हटला...'काही झालं तरी...'

ICC च्या मोठ्या पुरस्कारासाठी अभिषेक शर्मा-कुलदीप यादवमध्ये स्पर्धा; स्मृती मानधनालाही नामांकन

LAL KITAB PREDICTION 2025 : राहूमुळे तुमची शांतता होणार भंग ! 'या' राशींवर होणार वाईट परिणाम, जाणून घ्या मासिक राशिभविष्य

SCROLL FOR NEXT